Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Sopore : सोपोरमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार, एक पोलीस कर्मचारी जखमी

Webdunia
बुधवार, 19 जून 2024 (16:23 IST)
उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला येथील सोपोरमध्ये बुधवारी दुपारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या गोळीबारात सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र, कारवाईदरम्यान एक धाडसी पोलिसही जखमी झाला. जखमी जवानाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चकमकअजूनही सुरू आहे. 

बुधवारी सकाळी सोपोरच्या हदीपोरा गावात दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलांनी तातडीने परिसराला वेढा घातला. सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. सोपोर पोलिस, लष्कराच्या 32 आरआर आणि सीआरपीएफच्या जवानांनी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवली. परिसरात शोध घेतला. हा परिसर जीडीसी हडीपोरा आणि पानश कोचिंग इन्स्टिट्यूट हडीपोरा जवळ होता.हा परिसर बंद करण्यात आला. 
 
कडेकोटडेकोट बंदोबस्त पाहताच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले. अशा प्रकारे चकमक सुरू झाली. या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले.
 
 मंगळवारी क्यूआरटी वाहनातील लष्कराच्या जवानांनी शहरातील वीर भूमी पार्कच्या गेटबाहेर एक संशयास्पद बॅग जप्त केली. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. बॅगेची तपासणी केली असता लष्कराचा गणवेश, टी-शर्ट, पायजमा आणि एसएलआरचे काडतूस आढळून आले. पोलिसांनी ते आपल्या ताब्यात घेतले आहे.
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

पुढील लेख
Show comments