Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

कोटा मध्ये आत्महत्येचा आकडा 14, JEE ची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांची आत्महत्या

suicide
, शुक्रवार, 5 जुलै 2024 (11:31 IST)
राजस्थानमधील कोचिंग नागरी कोटा मध्ये विद्यार्थ्यंच्या आत्महत्येचे सत्र थांबत नसून दिवसेंदिवस वाढतच आहे. कोटा मध्ये परत एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. सात दिवसांमध्ये ही दुसरी घटना आहे. कोटा मधील महावीर नगरमध्ये राहत असलेला व JEE परीक्षेची तयारी करीत असलेला सोळा वर्षाच्या विद्यार्थ्याने फाशी लावली आहे. 
 
मृतक ने आपल्या खोलीमध्ये फाशी लावून आत्महत्या केली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दरवाजा तोडून या विद्यार्थ्यांचा मृतदेह फाशी वरून खाली काढला व पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. गेल्या 2023 पासून 29 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. 
 
पोलीस अधिकारींनी सांगितले की, हा विद्यार्थी खाजगी कोचिंग मध्ये JEE ची तयारी करीत होता. तसेच दोन वर्षांपासून आपल्या मोठ्या भावासोबत राहत होता. तसेच अधिकारींनी सांगितले की, या विद्यार्थ्यांचे आई-वडिल चार पाच वर्षांपूर्वी वारले आहे. तर काका या दोघी भावांना शिकवत होते व त्यांचे पालनपोषण करीत होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आसाम-मणिपुर मध्ये पुरामुळे हाहाकार, 56 जणांचा मृत्यू, 21 लाख लोक प्रभावित, शाळा-कॉलेज बंद