जेडीएस नेते आणि प्रज्वल रेवन्ना यांचा भाऊ सूरज रेवन्ना यांना लोकप्रतिनिधी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. एमएलसी आणि जेडीएस नेते डॉ सूरज रेवन्ना यांना एका पुरुषावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली भारतीय दंड संहितेच्या कलम 377, 342, 506 आणि 34 अंतर्गत अटक करण्यात आली होती.
जेडीएसच्या एका कार्यकर्त्याने त्यांच्यावर आरोप केले की त्यांनी नौकरी मिळवून देण्याच्या नावाखाली त्याचे लैंगिक शोषण केले.आणि अनैसर्गिक कृत्य केले.
27 वर्षाच्या एका तरुणाच्या तक्रारीवरून सुरज रेवण्णाला 22 जून रोजी अटक केली. हसन जिल्ह्यातील घनिकाडा येथे सुरजच्या फार्महाऊसवर 16 जून रोजी त्याने लैंगिक अत्याहार केले. असा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे.
२२ जून रोजी सूरजला अटक केली असून 23 जून रोजी न्यायालयाने त्याला आठ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली होती. ही मुदत सोमवारी संपली असून सीआयडीने सुरज रेवण्णाला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ केली.
25 जून रोजी पोलिसांनी सूरज रेवण्णाविरुद्ध लैंगिक छळाचा दुसरा गुन्हा दाखल केला. कोविड-19 महामारीच्या काळात तीन वर्षांपूर्वी तिचा छळ केल्याचा आरोप केला आहे. गेल्या आठवड्यात सुरजची वैधकीय तपासणी केली असून त्याचे डीएनए नमुने घेतले आहे.