Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मंगळावर अडकला तरी मदतीला येऊ : सुषमा स्वराज

sushama swaraj
, गुरूवार, 8 जून 2017 (16:36 IST)

परदेशात अडकलेल्या भारतीयांनी ट्विटरवरुन मदत मागितल्यास, त्यांना तत्परतेने मदतीचा हात देणाऱ्या सुषमा स्वराज यांचं ट्विटरवर अनेकदा कौतुक होत असतं. आता ही असच झाल.  करण सैनी नावाच्या ट्विटराईटने एक विनोदी ट्वीट केलं. ‘मी मंगळावर अडकलो आहे, मंगलयानावरुन 987 दिवसांपूर्वी पाठवलेलं जेवण संपत आलं. मंगलयान 2 कधी पाठवलं जाणार?’ असा प्रश्न करत करणने सुषमा स्वराज आणि इस्रोला टॅग केलं. मात्र आपल्या प्रश्नाला यापैकी कोणी उत्तर देईल, अशी अपेक्षाही त्याला नसावी.‘तुम्ही मंगळावर जरी अडकला असाल, तरी भारतीय दुतावास तुमच्या मदतीला धावून येईल’ असं उत्तर स्वराज यांनी दिलं. स्वराज यांच्या उत्तराचंही अनेक ट्विटराईट्सनी कौतुक केलं.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले, करमाळ्यातील आंदोलन मागे