जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात संशयित पाकिस्तानी ड्रोन 3 वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना दिसले. तीनही ड्रोन एकाच वेळी दिसले आणि काही वेळातच गायब झाले.
गुरुवारी रात्री 8.30 च्या सुमारास बारी-ब्राह्मण, चिलाद्या आणि गगवाल भागात ड्रोन एकाच वेळी दिसले,असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी पाकिस्तानला परतणार्या ड्रोनवर चिलाद्या येथे काही गोळ्या झाडल्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जम्मू-पठाणकोट महामार्गावरील बारी ब्राह्मणा आणि गगवाल येथील संवेदनशील सुरक्षा प्रतिष्ठानांवर घिरट्या घालताच इतर दोन ड्रोन आकाशातून गायब झाले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की,पोलिस व इतर सुरक्षा दलासह घटनास्थळाचा शोध घेण्यासाठी रवाना झाले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की या संदर्भात सविस्तर माहितीची प्रतीक्षा आहे.
सुमारे एक आठवड्यापूर्वी पोलिसांनी येथील सीमेजवळील कनचक परिसरात 5 किलो आयईडी सामग्री घेऊन जाणारे पाकिस्तानी ड्रोन पाडले.
पहिला ड्रोन हल्ला 26 जूनच्या रात्री जम्मू हवाई दलाच्या स्टेशनवर करण्यात आला. या हल्ल्यात स्फोटात हवाई दल स्थानकाच्या छताचे नुकसान झाले आणि दोन जवान जखमी झाले.त्यानंतर जम्मूमध्ये 13 वेळा संशयास्पद ड्रोन पाहिले गेले. गेल्या 3 महिन्यांत अशा सुमारे 30 घटना समोर आल्या आहेत.