Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गोवंश विक्री बंदीच्या अधिसूचनेला संपूर्ण देशात स्थगिती

Webdunia
बुधवार, 12 जुलै 2017 (11:49 IST)

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या गोवंश विक्री बंदीच्या अधिसूचनेला संपूर्ण देशभरात स्थगिती दिली आहे. सरन्यायाधीश जे एस खेहर आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

केंद्र सरकारने गोवंश विक्री बंदीसाठी अधिसूचना जारी केली होती. पण मद्रास हायकोर्टाने त्या अधिसूचनेला स्थगिती दिली होती. आता ही स्थगिती मद्राससह संपूर्ण देशभरात लागू झाली आहे.  सुप्रीम कोर्टाने ऑल इंडिया जमियतुल कुरेशी अॅक्शन कमिटीच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निकाल दिला आहे. या याचिकेत केंद्र सरकारने 23 मे रोजी जारी केलेल्या अधिसूचनेला आव्हान देण्यात आलं होतं.

स्थानिक बाजार जिथे गोवंशाची विक्री होते, तिथे राज्य सरकार निर्बंध लावत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकरणात ही अधिसूचना लागू होणार नाही, असं केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलं.

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

पुढील लेख
Show comments