योग सेवक या नावाने प्रसिद्ध असलेले वाराणसीचे 125 वर्षाचे स्वामी शिवानंद यांना आज पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. वाराणसीचे स्वामी शिवानंद यांचे आयुष्य भारतीय जीवन पद्धती आणि योगाचा प्रसारासाठी समर्पित केले. या साठी त्यांना केंद्र सरकारने या वर्षीचा पदमश्री पुरस्कार जाहीर केला आहे. त्या पुरस्काराचे वितरण करण्यासाठी त्यांना राष्ट्रपती भवन मध्ये आमंत्रित करण्यात आलं. हा पुरस्कार घेण्यासाठी ते अनवाणी आले होते.
हा पुरस्कार घेण्यासाठी जेव्हा त्यांचे नाव घेण्यात आले त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम पंतप्रधान मोदींच्या जवळ जाऊन त्यांना दंडवत घातला. नंतर त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दंडवत केलं .राष्ट्रपतींनी आपल्या जागेवरून उठून त्यांच्याजवळ जाऊन स्वामी शिवानंद यांना पदमश्री पुरस्कार प्रदान केला. असं घडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.