गाडी चालवताना फोन वर बोलणे कायदयानुसार बंदी आहे. गाडी चालवताना फोन वर बोलण्यामुळे अपघात घडतात.तरीही काही लोक गाडी चालवताना फोन वर बोलतात आणि अपघातांना बळी पडतात. या अपघाताचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. हे व्हिडीओ अंगाचा थरकाप उडवणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या मध्ये एक महिला गाडी चालवताना फोन वर बोलत आहे.बोलण्याचा नादात एक महिलेचा जीव थोडक्यात बचावला आहे.
हा व्हिडीओ दिल्ली पोलिसांनी शेअर केला आहे.या मध्ये एक महिला स्कुटीवरून जात आहे. तिला एक फोनवर कॉल येतो ती धावत्या स्कुटीला एका हाताने थांबवण्याचा प्रयत्न करून स्कुटीचा ब्रेक दाबते नंतर स्कुटीचे नियंत्रण सुटून गाडी पुढे धावत सुटते. तेवढ्यात समोरून ट्रक येतो आणि सुदैवाने ती ट्रक खाली जाण्यापासून बचावते.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर दिल्ली पोलीसच्या एक्स वर शेअर केला आहे.
या वर नेटकऱ्यानी कॉमेंट्स केले आहे.