तामिळनाडूच्या नमक्कल शहरात एएस पेट्टई येथे एका हॉटेल मधून आणलेला चिकन शोरमा खाऊन एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कलैयारासी असे या मयत मुलीचे नाव आहे. ही मुलगी आपल्या कुटुंबियांसह 16 सप्टेंबर रोजी फिरायला गेली असताना त्यांनी येताना एका हॉटेल मधून चिकन शोरमा आणला. घरी आल्यावर ते खाऊन मुलीला आणि कुटुंबियांच्या पोटात दुखू लागले आणि उलट्या होऊ लागल्या. त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता मुलीचा मृत्यू झाला.
अन्नातून विषबाधा झाल्याचे तपासणीत समोर आले आहे. पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत मुलीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहे.
मुलीच्या कुटुंबीयांनी ज्या हॉटेल मधून जेवण घेतले होते त्याच वेळी मेडिकल कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांनी देखील तिथूनच जेवण घेतले असून त्यांना देखील त्रास होऊ लागला. त्यांना देखील अन्नातून विषबाधा झाल्याचे समजले. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.