Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लव्ह जिहादवर वाद, तनिष्कने काढून टाकली जाहिरात

Webdunia
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020 (16:58 IST)
मुंबई- अलीकडेच तनिष्क ज्वेलरी कंपनीने एक नवीन जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीवर बरेच वाद सुरू झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर या जाहिरातीवर कारवाई करण्याची विनंती केली जात आहे. कारण काहीं लोकांच्यामते, या जाहिरात लव्ह जिहादला प्रोत्साहन दिले जात आहे. 
 
या जाहिरातीत एका हिंदू मुलीने एका मुस्लिम मुलाशी लग्न केलं असून त्या मुलीचं डोहाळे जेवणाचा सोहळा पार पडताना दाखवण्यात येत आहे. काही लोकांच्या मते, जाहिरातीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला आहे. आता या जाहिरातीवर अभिनेत्री कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. 
 
तनिष्कच्या जाहिरातीवर टीका करत कंगनाने लिहिले की, 'एक हिंदू सून बर्‍याच दिवसांपासून कुटुंबासोबत असली तरी ‍वारस देताना तिला स्वीकारलं जातं. मग मुलगी ही काय फक्त बाळ जन्माला घालणारी मशीन आहे का? ही जाहिरात केवळ लव्ह जिहादलाच नव्हे तर लिंगभेदालाही प्रोत्साहन देते.
 
सोशल मीडियावर या जाहिरातीवरून होत असलेली टीका पाहिल्यानंतर तनिष्क कंपनीने ही जाहिरात मागे घेतली आहे. या जाहिरातीची यूट्यूब लिंक कंपनीने प्रायव्हेट केली आहे. यामुळे ही जाहिरात लोकांना पाहता येणार नाही. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

पुढील लेख
Show comments