Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

तीस्ता सेटलवाड यांचा जामीन अर्ज फेटाळला, तत्काळ आत्मसमर्पण करण्याचे हायकोर्टाचे आदेश

तीस्ता सेटलवाड यांचा जामीन अर्ज फेटाळला, तत्काळ आत्मसमर्पण करण्याचे हायकोर्टाचे आदेश
, शनिवार, 1 जुलै 2023 (15:09 IST)
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांचा जामीन अर्ज गुजरात हायकोर्टाने फेटाळून लावला आहे. सेटलवाड यांनी तत्काळ आत्मसमर्पण करावं, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.
 
2002 च्या गुजरात दंगल प्रकरणात षडयंत्र केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात तीस्ता सेटलवाड यांना सप्टेंबर 2022 मध्ये सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला होता.
 
अंतरिम जामीनामुळे इतके दिवस त्यांची अटक टळली होती. भारताचे सरन्यायाधीश (CJI) उदय उमेश ललित यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती एस रवींद्र भट आणि सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने तीस्ता सेटलवाड यांना अंतरिम जामिनाचा आदेश दिला होता.
 
या प्रकरणी 2 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत कोर्टाने तीस्ता सेटलवाड यांना सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला होता.
 
पण, आता गुजरात हायकोर्टातील न्यायाधीश निर्झर देसाई यांनी सेटलवाड यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्या अंतरिम जामिनावर बाहेर असून त्यांनी तत्काळ आत्मसमर्पण करावं, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
 
सत्र न्यायालय आणि गुजरात हायकोर्ट यांच्याकडून जामीन फेटाळण्यात आल्यानंतर सेटलवाड यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
 
17 सप्टेंबर रोजी त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. दरम्यान, आज त्यांना अंतरिम जामीन सुप्रीम कोर्टाकडून मंजूर करण्यात आला आहे.
तीस्ता सेटलवाड यांना गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथका (ATS) ने 25 जून 2022 रोजी मुंबईतून अटक करण्यात आली होती.
 
झकिया जाफरींच्या कायदेशीर लढाईत तीस्ता सह-याचिकाकर्त्या
अहमदाबादमधील गुलबर्ग सोसायटीतील दंगलीत काँग्रेसचे माजी खासदार अहसान जाफरी यांच्यासह एकूण 69 जणांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणात नरेंद्र मोदी आणि इतर कथित गुन्हेगारांना विशेष तपास पथकाने (एसआयटी) क्लीन चिट दिली होती. या संदर्भात पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी एहसान जाफरी यांच्या पत्नी झकिया जाफरी यांनी केली होती. झकिया जाफरी यांच्या या कायदेशीर लढाईत तीस्ता सेटलवाड सहयाचिकाकर्ता आहेत.
 
झकिया जाफरी यांच्या तक्रारीमागे तीस्ता सेटलवाड यांचा हस्तक्षेप असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांचं म्हणणं आहे.
 
तीस्ता सेटलवाड कोण आहेत?
तीस्ता सेटलवाड या मुंबईस्थित सामाजिक कार्यकर्त्या आहेत. भारत सरकारनं त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केलंय.
 
तीस्ता सेटलवाड या भारताचे पहिले ऑटर्नी जनरल एम सी सेटलवाड यांच्या नात आहेत.
 
200 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलीनंतर स्थापन झालेल्या 'सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस' या स्वयंसेवी संस्थेच्या त्या संस्थापिका विश्वस्त आहेत.
 
तसंच, त्या सातत्यानं सामाजिक विषयांवर आवाज उठवत असतात.
 



Published By- Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ENG vs AUS : मार्नस लाबुशेनने तोंडात जमिनीवर पडलेली च्युइंगम टाकली, घटना कॅमेऱ्यात कैद