Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जगातील सर्वात आश्चर्यकारक म्हैस'; काय विशेष आहे जाणून घेऊ या

The most amazing buffalo in the world '; Let's find out what's special जगातील सर्वात आश्चर्यकारक म्हैस'; काय विशेष आहे जाणून घेऊ या  Marathi National News Lokpriya Marathi News  In Webdunia Marathi
, रविवार, 19 डिसेंबर 2021 (14:27 IST)
हरियाणातील कैथलच्या प्रसिद्ध सुलतान झोंटाचे किस्से आपण ऐकलेच असतील . 21 कोटींची किंमत असलेल्या सुलतानचे काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हा सुलतान महागडी व्हिस्की आणि उत्कृष्ट अन्न खायचा.
हिमाचल प्रदेशातील सोलन येथील प्राणी प्रदर्शनात पंजाबच्या फाजिल्का येथून आणलेली बहुमोल आकर्षक म्हैस आकर्षणाचे केंद्र ठरली. हरियाणाच्या सुलतान झोंटाप्रमाणे या म्हशीच्या देखभालीसाठीही वर्षाला एक कोटी रुपये खर्च येतो. पशु मेळ्यात आलेले केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी त्याचे सौंदर्य आणि उंची पाहून त्याला कायमस्वरूपी चॅम्पियन घोषित केले. 5 फूट 9 इंच उंचीची ही म्हैस दररोज 20 प्रकारचे विशिष्ट अन्न खाते. या म्हशीच्या मालकाने सांगितले की ,या म्हशींची देखरेख करण्यासाठी वर्षभरात एक कोटी पेक्षा जास्त खर्च येतो. हिला 20 प्रकारचे विशिष्ट खाद्य दिले जाते. या म्हशीची उंची 5.9 फीट असून ही म्हैस सहा वर्षाची आहे. ही म्हैस दररोज पाच किलोमीटर चालते आणि अंघोळी नंतर तेलाची मॉलिश केली जाते. ह्या म्हशीला छोटा हत्ती असे ही म्हणतात. 
या मेळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आलेले केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी त्याचे सौंदर्य आणि उंची पाहून त्याला कायमस्वरूपी चॅम्पियन घोषित केले. ते म्हणाले की, सध्या देशात आणि परदेशात एकच नाव सुरू आहे, ते म्हणजे नरेंद्र मोदी. त्यांच्याप्रमाणेच फाजिल्काची ही सुंदर म्हैसही जगात प्रसिद्ध होईल.
म्हशीच्या मालकाने सांगितले की म्हशीची आई लक्ष्मी देखील चॅम्पियन आहे. ती दररोज 25 लिटर दूध देते. तिच्या सिमन्स ला खूप मागणी आहे. तिचे सिमेन्स लाखाच्या किमतीत विकले जातात. त्याच प्रमाणे ही म्हैस तिच्या पावलावर पाऊल टाकत आहे.  म्हशीचे मालक म्हणाले , की जरी  ते व्यवसायाने वकील आहे तरी ही देशाचे पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत स्वावलंबी होत आहे. म्हणून मी हे म्हशीचे व्यवसाय करतो . माझ्याकडे एकापेक्षा जास्त म्हशी आहेत. पण सर्वात चांगली आणि आश्चर्यकारक असणारी ही विजेती म्हैस आमच्याकडे आहे. आज संपूर्ण पंजाब आणि त्यांच्या गावाला या म्हशीचा अभिमान वाटतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धक्कादायक बातमी ! 12 तासात भाजपच्या दोन नेत्यांची हत्या ,कलम 144 लागू