Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पावसामुळे दिल्ली-एनसीआरची वाईट अवस्था,रस्त्यात मोठे खड्डे झाले

Webdunia
शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (14:17 IST)
दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस दिलासा कमी अडचणीत वाढ अधिक करत  आहे.मुसळधार पावसामुळे दिल्ली विमानतळासह अनेक सखल भागात पाणी साचले असताना, गाझियाबादच्या इंदिरापुरम येथील शिप्रा सृष्टी सोसायटीजवळ रस्ता खचला .रस्ता खचल्याने मोठा खड्डा झाला. माहिती मिळताच पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रस्ता वाहतुकीसाठी बंद केला.
 
नोएडा, गुरुग्राम आणि फरिदाबादमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पावसामुळे रस्त्यांवर लांबच लांब वाहतूक कोंडी झाली.पाण्याचा उपसा करण्याची व्यवस्था आणि महानगरपालिकांनी केलेले दावेही मुसळधार पावसामुळे कोलमडले.सर्व ठिकाणी अंडरपासला पूर आला होता. यामुळे लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
 
दिल्ली विमानतळावरून पाच विमाने वळवण्यात आली 
 
यासह, शनिवारी सकाळी दिल्लीत मुसळधार पावसामुळे दिल्ली विमानतळ परिसर आणि शहराच्या इतर भागात पाणी साचले. खराब हवामानामुळे शनिवारी सकाळी पाच उड्डाणे विमानतळावरून वळवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.ही उड्डाणे जयपूरकडे वळवण्यात आली आहेत. दुबईहून दिल्लीला येणारे आंतरराष्ट्रीय विमानाच्या मार्गाला बदलून  अहमदाबादला पाठवण्यात आले आहे.
 
दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (DIAL) ने ट्विट केले आहे की अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे विमानतळ परिसर काही काळासाठी जलमय झाला होता. डायल म्हणाले की आमच्या टीमने लगेच ही समस्या लक्षात घेतली आणि ती सोडवली गेली.
 
महानगरपालिकांच्या मते, मोती बाग आणि आर के पुरम व्यतिरिक्त, मधु विहार, हरी नगर, रोहतक रोड, बदरपूर, सोम विहार, आयपी स्टेशन जवळ रिंग रोड, विकास मार्ग, संगम विहार, मेहरौली-बदरपूर रोड, पुल प्रल्हादपूर अंडरपास, मुनिरका,राजपूर खुर्द, नांगलोई आणि किराडी सह इतर मार्गांवरही पाणी साचले होते. लोकांनी रस्त्यावर पाणी साचल्याची चित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले.
 
ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये मधु विहारमधील पाणी भरलेले रस्ते दाखवण्यात आले आहेत, ज्यात काही डीटीसी क्लस्टर बस पाण्यात उभ्या आहेत आणि इतर प्रवासी वाहने पाण्याखालून ओढताना दिसत आहेत.
 
ट्विटर युजर्सनी सदर बाजार परिसरात, मिंटो पुलाजवळ, आयटीओ आणि नांगलोई पुलाजवळ पाणी साचल्याचे व्हिडिओ देखील पोस्ट केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांनी सांगितले की, कर्मचारी रस्त्यावरून पाणी काढून टाकण्याचे काम करत आहेत.
 
पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी पहाटे मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. आम्ही प्राधान्य तत्त्वावर या समस्येचा सामना करत आहोत. आमचे कर्मचारी चोवीस तास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
 
दिल्ली वाहतूक पोलिसांनी देखील ट्वीट करून लोकांना अशा मार्गांविषयी माहिती दिली जिथे त्यांना पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यांनी सकाळी अकराच्या सुमारास ट्विट केले, "वाहतूक सतर्कता. जीजीआर/पीडीआरमध्ये पाणी साचल्याने रहदारी जाम आहे. कृपया हा मार्ग वापरणे टाळा. दुसऱ्या ट्विटमध्ये वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे की, "वाहतूक सतर्कता. डब्ल्यूएचओजवळ रिंगरोडवर पाणी साचले आहे. कृपया या मार्गावर प्रवास करणे टाळा. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments