Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हा तर भारताचा व प्रत्येक भारतीयांचा अपमान : चंद्रकांत पाटील

Webdunia
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (15:52 IST)
“आपण सचिन तेंडुलकरच्या मताशी असहमत किंवा सहमत होऊ शकता, पण आपल्या खेळाने जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचावणाऱ्या अशा खेळाडूचा अपमान तेच करू शकतात, ज्यांची विचारधारा व देशाप्रतीच्या निष्ठेत खोट असेल. हा केवळ भारतरत्न सचिन तेंडुलकरचा अपमान नाही, तर भारताचा व प्रत्येक भारतीयांचा अपमान आहे. अशा शब्दांमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.”
 
 केरळमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सचिनच्या फोटोवर काळे तेल ओतून त्याचा निषेध नोंदवला. यामुळे आता भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून काँग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे.
 
“एकदा केरळ येथील युवक कॉंग्रेसने बीफ बॅनविरुद्ध आंदोलन करत असताना गौमातेला भर रस्त्यात कापून टाकल्याचे दृश्य संपूर्ण देशाने पाहिले आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा गौरव असणाऱ्या सचिन तेंडुलकर यांचा केरळ युवक काँग्रेसने केलेल्या अपमानाचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो!” अशा शब्दांमध्ये चंद्रकांत पाटील यांनी युवक काँग्रेसच्या कृतीचा निषेध नोंदवला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

पुढील लेख
Show comments