Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नदीत ट्रॅक्टर बुडाला, 1 महिलेचा मृत्यू; डझनभर लोक बेपत्ता

Tractor sinks in river
, बुधवार, 19 जानेवारी 2022 (14:33 IST)
पाटणा. बिहारमधील भगवानपूर दियारा भागात गंडक नदीत मोठी दुर्घटना घडली. येथे होडीत चढत असताना ट्रॅक्टर नदीत बुडाला. अपघाताच्या वेळी ट्रॅक्टरवर डझनभर लोक असल्याची माहिती आहे. हे सर्वजण नदी  पार करून शेताकडे जात होते. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर, मोठ्या संख्येने लोक बेपत्ता आहेत. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. अपघातात बळी पडलेल्या अर्धा डझन लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.त्यांच्या वर गोपालगंज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अपघातानंतर 5-6 लोक नदीतून पोहून बाहेर आले होते. तर अजूनही काही लोक वाहनाखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. वृत्तानुसार,हॉर्न वाजवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. हॉर्न वाजवण्याचा प्रयत्न करत असतानाच ट्रॅक्टर आपोआप सुरू झाला आणि हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
 
वृत्तानुसार, भगवानपूर घाटावरून एका ट्रॅक्टर ट्रॉली ला एका मोठ्या बोटीत भरून दीयराकडे नेण्याची तयारी सुरू होती. या भीषण अपघाताची माहिती मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. तर गोपालगंज आणि पश्चिम चंपारण पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले  आहे. एनडीआरएफ (NDRF) टीम बेपत्ता लोकांच्या शोधात लागली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नगरपंचायत निकाल : पंकजा मुंडे, रोहित पवार, यशोमती ठाकूर यांनी गड राखले तर विश्वजित कदम आणि निलेश लंकेंना धक्का