Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या मोबाईलची चोरी

ujjwal nikams mobile stolen from train
, मंगळवार, 6 जून 2017 (11:31 IST)

झेड प्लस सुरक्षेचं कवच भेदून चोरट्यांनी  विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या मोबाईलची चोरी झाली आहे.  ही घटना दादर-पठाणकोट एक्स्प्रेसमध्ये घडली आहे.प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना झेड-प्लस सुरक्षा आहे. पुरवण्यात आली आहे. सुरक्षा असूनही त्यांचा मोबाईल चोरीला गेल्यामुळे सुरक्षा प्रश्न निर्माण झाला आहे.उज्ज्व निकम हे मुंबईहून जळगावला ट्रेनने प्रवास करत होते. दादर-अमृतसर-पठाणकोट एक्स्प्रेसने रात्री प्रवास करताना त्यांनी आपल्या जवळ  दोन फोन ठेवले होते.  सकाळी उठल्यानंतर फोन चोरीस गेले होते.जळगावला उतरल्यावर उज्ज्वल निकम रेल्वे पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली.मुंबई हल्ल्याचा खटला लढण्यास सुरुवात केल्यापासून म्हणजेच 2009 पासून उज्ज्वल निकम यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पीककर्ज वाटपाच्या गंभीर संकटामुळे विदर्भ मराठवाड्यात कृषी संकट वाढणार