Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रात्री प्रियकराला भेटण्यासाठी ती आई-वडिलांना देत होती झोपेच्या गोळ्या

Webdunia
शुक्रवार, 5 जानेवारी 2024 (17:50 IST)
गोरखपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तिवारीपूर परिसरातील एका वस्तीत आपल्या मैत्रिणीला तिच्या घरी भेटायला आलेल्या तरुणाला मुलीच्या कुटुंबीयांनी पकडले आणि बेदम मारहाण केली. यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
 
प्रियकराला भेटता यावं म्हणून मुलगी तीन महिन्यांपासून आई-वडिलांना झोपेच्या गोळ्या देत होती. ती जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळून जेवू घातलं होती. ती पालक झोपल्यावर तरुणाला अनेकदा तिच्या घरी बोलावत असे. मुलगी दहावीत शिकत असून प्रियकराला निवांतात भेटण्यासाठी ती हे काम करत असे. मात्र हा प्रकार शेजार-पाजारच्यांच्या लक्षात आल्याने सर्वांनी मिळून दोघांचे बिंग फोडण्याचा निर्णय घेतला होता. पालकांनी गुरुवारी सायंकाळी औषध घेतले नाही आणि झोपेचे नाटक केले.
 
आई-वडील झोपले आहेत, असा विचार करून तरुणीने तिच्या प्रियकराला बोलावले. तो तरुण घरात पोहोचताच त्याच्या पालकांनी त्याला पकडून गजर केला. हा तरुण अंधियारी बाग येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments