उत्तराखंडमधील पिथौरागढ मध्ये आज सकाळी पावणे सात दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर स्केल वर याची तीव्रता 3.1 मोजली गेली. देवभूमीमध्ये अचानक भूकंपाचे धक्के जाणवल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उत्तराखंडमधील पिथौरागढ मध्ये आज सकाळी पावणे सात दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर स्केल वर याची तीव्रता 3.1 मोजली गेली. देवभूमीमध्ये जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. नागरिक घाबरून घराबाहेर निघालेत.
सामान्यतः भूकंपामुळे सुदैवाने कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. गेल्या वर्षी या परिसरात अनेक वेळेस भूकंपाचे धक्के जाणवले होते. यामुळेच येथील नागरिकांच्या मनात आता भीती निर्माण झाली आहे. मार्च महिन्यामध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते. तसेच नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी कडून मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाचे धक्के पिथौरागढ मध्ये 5 किलोमीटर खोलात आले होते.