Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उत्तराखंड: मसुरी-डेहराडून महामार्गावर भीषण अपघात, अनियंत्रित बस दरीत कोसळली

Webdunia
रविवार, 2 एप्रिल 2023 (15:20 IST)
उत्तराखंडमधील मसुरी-डेहराडून मुख्य रस्त्यावर शेरगडीजवळ एक भीषण रस्ता अपघात झाला. या महामार्गावर एका बसचे नियंत्रण सुटून ती खड्ड्यात पडली. अपघाताची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस, आयटीबीपी, अग्निशमन दल, 108, आरोग्य विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले.जखमींना दरीतून बाहेर काढून रुग्णालयात पाठविले आहे. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला 19जखमींना डेहराडूनला पाठवण्यात आले आहे, तर काहींवर मसुरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस डेहराडूनच्या दिशेने जात होती आणि याच दरम्यान ITBP जवळील एका वळणावर ती अनियंत्रित होऊन दरीत पडली. माहिती मिळताच, आयटीबीपी आणि पोलीस स्टेशन मसुरी आणि पोलिसांसह इतर मदत पथक घटनास्थळी पोहोचले, तेथून जखमींना बाहेर काढले जात आहे. बसमध्ये सुमारे 40 जण प्रवास करत असल्याचे सांगण्यात आले. सध्या बसमध्ये असलेल्या लोकांची सविस्तर माहिती उपलब्ध नाही. मदत बचाव कार्य सुरू आहे.
 
Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

पुढील लेख
Show comments