Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

उत्तराखंड : गंगोत्री हायवेवर पहाडावरून दगड कोसळल्याने एकाच मृत्यू, महिला बेपत्ता तर अनेक लोक जखमी

death
, शनिवार, 1 जून 2024 (11:03 IST)
उत्तराखंड मधील गंगोत्री हायवेवर एक भयंकर घटना घडली आहे. पहाडांवरून दरड कोसळ्यामुळे एकाच मृत्यू  झाला आहे तर एक महिला बेपत्ता झाली आहे. तसेच अनेक लोक जखमी झाले आहे. अधिकारींनी दिलेल्या माहितीमध्ये पहाडांवरून दगड पडण्याची घटना वारंवार घडत आहे. यामुळे एंक गाड्यांचे नुकसान झाले आहे. जखमींना हेलिकॉप्टर व्दारा रुग्णालयात दाखल करण्यात आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी पहाडांवरून दरड कोसळली. यामुळे चार मजूर सोबत बारा लोक गंभीररीत्या जखमी झालेत. तर एकाच मृत्यू झाला आहे. अधिकारींनी सांगितले की, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यांमधील दोनजणांची प्रकृती अस्थिर आहे. 
 
या घटनेची सूचना मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहचली. पोलीस, एसडीआरएफ, एनडीआरएफ ची जवान आणि आपदा प्रबंधन विभागची टीमने  वेळेवर पोहचून बचाव कार्य सुरु केले. 
 
अधिकारींनी सांगितले की, रस्त्याच्या खालील भागामध्ये भीत निर्माण करणारे बीआरओ चा एक ट्रकचे या घटनेमध्ये नुकसान झाले. ते म्हणाले की, दगड कोसळल्याने एक जेसीबी मशीन आणि पाण्याचा टँकर, बुलेरो, एक मारुती 800, एक बाईक यांचे नुकसान झाले आहे. तसेच पहाडांवरून वारंवार दगड कोसळत आहे. ज्यामुळे लोकांना राष्ट्रीय राजमार्गावरून दोन्ही बाजूंनी आपले आपले वाहन काढण्यास सांगितले आहे. 

Edited By- Dhanashri Naik  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणे पोर्श कार अपघात प्रकरण : त्रस्त बार मालक HC ला म्हणालेत-आम्हाला बळीचा बकरा बनवला जाते आहे