देशातील सर्वात सुरक्षित म्हटल्या जाणाऱ्या दिल्लीतील तिहार तुरुंगात पुन्हा एकदा कैद्यांमध्ये हिंसक हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. तिहार तुरुंगात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या या हिंसक संघर्षात सुमारे 15 कैदी जखमी झाले आहेत. डीजी तिहारच्या म्हणण्यानुसार, ही घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, तिहारच्या तुरुंग क्रमांक 8/9 मध्ये कैद्यांमध्ये हाणामारी झाली, ज्यामध्ये 15 कैदी जखमी झाले. 4 कैद्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आणि प्राथमिक उपचारानंतर पुन्हा कारागृहात आणण्यात आले. उर्वरित जखमी कैद्यांवर कारागृहातच उपचार करण्यात आले.
डीजी तिहार यांच्या म्हणण्यानुसार, तुरुंग प्रशासनावर दबाव आणण्यासाठी कैदी हे करतात. काही कैद्यांना प्राथमिक उपचारानंतर पुन्हा तुरुंगात हलवण्यात आल्याचे तिहार प्रशासनाने सांगितले. उर्वरित जखमी कैद्यांवर कारागृहातच उपचार सुरू आहेत. कारागृह प्रशासनाने या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
तिहार तुरुंगात कैद्यांमध्ये हाणामारी होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी फेब्रुवारीमध्येही तिहार तुरुंगात कैद्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती आणि या घटनेत सहायक तुरुंग अधीक्षक आणि वॉर्डनही जखमी झाले होते. या झटापटीत चार कैदी गंभीर जखमी झाले होते