Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आम्ही स्वबळावरच लढणार

We will fight
मुंबई , शुक्रवार, 8 जून 2018 (12:13 IST)
आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना आपला त्रिपक्षच राहील, अशी ग्वाही भाजप अध्यक्ष अतिम शहा यांनी 'मातोश्री' भेटीत दिली असल्याचे सांगण्यात येत असले तरी, शिवसेना स्वबळावर निवडणुका लढण्यावर ठाम आहे. शहा यांचा अजेंडा आम्ही जाणून आहोत. त्यामुळे पुढील निवडणुका स्वबळावर लढण्याचा ठराव पक्षाने केला आहे. काहीही झाले तरी त्यात बदल होणार नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
 
'संपर्क फॉर समर्थन' अभियानांतर्गत मुंबई दौर्‍यात शहा यांनी काल मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्यातील युती भक्कम करून विरोधकांशी दोन हात करण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे कळते. शहा यांच्या अजेंड्याविषयी आम्हाला माहिती आहे. पण आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याचा ठराव केला आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही, अशी ठाम भूमिका राऊत यांनी मांडली.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एका इसमाचा लग्नाच्या 15 मिनिटात घटस्फोट