Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाब्बास सिरीशा ! ही भारतीय तरुणी घेणार अंतराळात झेप

Well done Sirisha! This Indian girl will take a leap into space
, शनिवार, 3 जुलै 2021 (17:54 IST)
कल्पना चावला नंतर भारतातील दुसरी मुलगी आता लवकरच अंतराळात झेप घेण्याचे वृत्त समजल्यापासून  या उड्डाणाकडे सर्व भारतीयांचे लक्ष वेधले आहेत.

हा मान  मिळाला आहे भारतीय तरुणी सिरीशा बादला ला.सिरीशा 34 वर्षाची असून एरोनॉटिकल इंजिनियर आहे.सिरीशा चा जन्म भारतातीलआंध्रप्रदेशातील गुंटूर जिल्ह्याततील  एका गावात झाला आहे.तिनं इंडियानाच्या पर्ड्यू विश्वविद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.आणि टेक्सासच्या ह्यूस्टनं येथून तिचे शालेय शिक्षण झाले आहे.
 
 अंतराळात संशोधन विभागाची जबाबदारी सांभाळणार असून येत्या 11 जुलै रोजी मॅक्सिकोमधून ही उड्डाण होणार आहे.या मोहिमेत एकूण सहा जणांचा समावेश असून दोन महिलांचा समावेश देखील आहे.त्यापैकी एक शास्त्रज्ञ आहेत.
 
सिरीशा ने ट्विट करून तिला युनिटी 22 क्रू आणि कंपनीचे  एक भाग केले आहे.हे तिच्यासाठी खूप अभिमानस्पद आहे असे सांगितले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवी मुंबईत बोगस लसीकरण, गुन्हा दाखल