Bay of Bengal Accident:पश्चिम बंगालमधून एका मोठ्या अपघाताची बातमी समोर आली आहे. बंगालच्या उपसागरात मासेमारी करण्यासाठी गेलेला एक ट्रॉलर (मासेमारी जहाज) बुडाला. या अपघातानंतर जहाजावरील 18 मच्छिमार बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. तटरक्षक दल आणि प्रशासनाने बेपत्ता मच्छिमारांचा शोध सुरू केला आहे. याशिवाय बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक मच्छिमारांचीही मदत घेण्यात आली आहे. मात्र, अद्याप एकाही मच्छिमाराचा शोध लागलेला नाही.
सर्व मच्छिमार सुंदरबन परिसरातील रहिवासी होते
सुंदरबन परिसरात राहणारे हे सर्व मच्छिमार एमव्ही सत्यनारायण नावाच्या फिशिंग ट्रॉलरने बंगालच्या उपसागरात मासे पकडण्यासाठी गेले होते. खाडीत काकडद्वीपजवळ कशाने तरी आदळल्याने मासेमारी करणारा ट्रॉलर बुडाला. माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनेचा आढावा घेतला. मच्छिमारांचा शोध घेण्यासाठी तटरक्षक दल तैनात करण्यात आले आहे. आतापर्यंत एकही मच्छीमार सापडला नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.