चोर पण करोडपती होऊ शकतो यावर विश्वास बसत नाही.पण गुजरात पोलिसांनी वापी येथे एक लाख रुपयांच्या चोरी प्रकरणात एका आरोपीला अटक केली असून तपास केला असता त्याची राहणीमान ऐकून पोलीस थक्क झाले. आरोपी हा आलिशान हॉटेल मध्ये राहायचा आणि विमानाने प्रवास करायचा.असे पोलीस म्हणाले.
रोहित सोलंकी असे या आरोपीचे नाव असून त्याने अनेक राज्यात चोरी केली आहे. गेल्या महिन्यात त्याने वापी येथे एक लाख रुपयांची चोरी केली या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार आल्यावर पोलिसांनी चोराचा शोध घेतला आणि या प्रकरणी आरोपी रोहितला अटक केली.
पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीच्या पैशातून लग्जरी जीवन जगत असल्याचे सांगितले. त्याने आता पर्यंत एकुण 19 चोरीच्या घटना कल्याचे कबूल केले. त्याने वलसाडमध्ये तीन, सुरत मध्ये 1 पोरबंदर मध्ये 1 सेलवाल मध्ये 1 तेलंगणामध्ये 2 आंध्रप्रदेशात 2 मध्यप्रदेशात 6 आणि महाराष्ट्रात 6 चोरीच्या घटना केल्या आहे. त्याने एका मुस्लिम महिलेशी लग्न करण्यासाठी आपले नाव बदलले.
आरोपीने चोरी करून मुंबईतील मुंब्रा परिसरात एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचे आलिशान फ्लॅट घेतले असून तो तिथे राहायचा.त्याच्याकडे ऑडी कार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तो आलिशान हॉटेल्स मध्ये राहायचा, विमानाने प्रवास करायचा, हॉटेल मधून येजा करण्यासाठी कॅब बुक करायचा.चोरी करण्यापूर्वी तो सोसायट्यांमध्ये जाऊन रेकी करायचा.त्याचे दरमहाचे खर्च 1.50 लाख रुपये असल्याचे वलसाड पोलिसांनी सांगितले.