उत्तराखंडमधील नैनितालमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे एका तरुणाने सापाला पकडले, त्याचे तोंड अनेकवेळा चावले आणि त्याचे तुकडे करून चावून खाल्ले. तरुणाने साप खाल्ला त्यावेळी तो नशेच्या अवस्थेत होता. या तरुणाविरुद्ध वन्यजीव कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक जिवंत साप खात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ उत्तराखंडच्या नैनिताल जिल्ह्यातील लालकुआन भागातील असल्याचे आढळून आले.
लालकुवान येथील रेल्वेच्या जमिनीवर अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारकांना रेल्वे व जिल्हा प्रशासनाच्या पथकाने एकत्रितपणे मोकळे केले होते. यादरम्यान एक साप बाहेर आला. यादरम्यान अतिक्रमण तोडल्याने एक तरुण संतापला. तो आधीच दारूच्या नशेत होता.
त्या तरुणाने सापाला पकडले आणि रागाच्या भरात तो तोंडाने चावू लागला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही लोक तरुणाला हा धोकादायक स्टंट करणे थांबवण्यास सांगत आहेत. तर काही लोक या तरुणाला साप मारण्यासाठी सांगत आहेत.
तरुणाने आपल्याच नादात सापाला कापून त्याचे तुकडे केले. काही वेळाने साप मेला. यादरम्यान एका तरुणाने हा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला.
याप्रकरणी वनविभागाचे परिक्षेत्र अधिकाऱ्यानी सांगितले की, जिवंत साप चावण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याच्यावर वन्यजीव कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदैवाने सापाचे विष तरुणाच्या अंगात शिरले नाही आणि तो तरुण वाचला