Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'भारतात मुस्लिमांना अस्पृश्य बनवण्यात आले', AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी असे का म्हणाले?

AIMIM Chief Asaduddin Owaisi
, सोमवार, 21 ऑक्टोबर 2024 (09:44 IST)
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तराखंड सरकारवर निशाणा साधला असून भारतात मुस्लिमांना अस्पृश्य बनवण्यात आल्याचे सांगितले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्या X हँडलवर मुस्लिमांशी संबंधित पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणाले आहे की,  'भारतात मुस्लिमांना अस्पृश्य बनवण्यात आले आहे. उत्तराखंडमधील चमोली येथे 15 मुस्लिम कुटुंबांवर सामूहिक बहिष्कार घातला जात आहे. तर 31 डिसेंबरपर्यंत मुस्लिमांना चमोली सोडावी लागेल, अशी धमकी चमोलीच्या व्यापाऱ्यांनी दिली आहे.  
 
तसेच ओवेसी म्हणाले, 'हे तेच उत्तराखंड आहे जिथे सरकार समानतेच्या नावाखाली समान नागरी संहिता लागू करत आहे. तर चमोलीच्या मुस्लिमांना समानतेने आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार नाही का? मोदी अरब शेखांना मिठी मारू शकतात तर चमोलीच्या मुस्लिमांनाही मिठीत घेऊ शकतात. शेवटी मोदी हे सौदी किंवा दुबईचे नव्हे तर भारताचे पंतप्रधान आहे असे देखील ते म्हणाले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रायगड मधील नदीमध्ये बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळला, हत्या की आत्महत्या याचा तपास सुरु