Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

एटीएसच्या दबावामुळे मालेगाव स्फोट प्रकरणी योगींचे नाव घेतले-साक्षीदार

एटीएसच्या दबावामुळे मालेगाव स्फोट प्रकरणी योगींचे नाव घेतले-साक्षीदार
, बुधवार, 29 डिसेंबर 2021 (10:53 IST)
मालेगावमध्ये 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी राज्यातील दहशतवाद विरोधी पथककाने (एटीएस) धमकावल्यामुळं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह आरएसएसच्या चार जणांची नावं घेतली होती, अशी साक्ष एका साक्षीदारानं मंगळवारी विशेष न्यायालयात दिली.
या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास सुरू असताना मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह एटीएसचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते.
या प्रकरणी सध्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह इतर आरोपींवर खटला सुरू आहे. या प्रकरणी साक्षीदारानं एटीएसनं छळ केल्याचंही कोर्टात म्हटलं आहे. दरम्यान, कोर्टानं साक्षीदाराला फितूर घोषित केलं.
हे प्रकरण एनआयएकडे वर्ग होण्यापूर्वी एटीएस अधिकाऱ्याने या प्रकरणी योगी आदित्यनाथ, इंद्रेश कुमार यांच्यासह संघाच्या चार नेत्यांची नावं घेण्याची धमकी दिली होती, असं या साक्षीदारानं म्हटलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर गंभीर अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू