Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

महिला जज ची मुजोरी उचलला पोलिसावर हात

महिला जज ची मुजोरी उचलला पोलिसावर हात
, सोमवार, 25 सप्टेंबर 2017 (08:05 IST)
अलाहाबाद  येथील एका  महिला न्यायाधीशाने पोलिस कॉन्स्टेबलला कानाखाली मारत पोलिसाची वर्दी फाडण्याचा प्रयत्न केला आहे. हे सर्व एका व्हीडीयोतून समोर आले आहे. . उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  उत्तर प्रदेशच्या महिला न्यायाधीशाला निलंबित करण्यात आलं आहे. 

यामध्ये महिला न्यायधीश असलेल्या जया पाठक यांचा मुलगा रोहन याला  देहरादूनमधील शिकतो.  त्याला आणि इतर काहीना पोलिसांनी  12 सप्टेंबरला मारहाणीच्या प्रकरणात  प्रेम नगर पोलिस स्थानकात हजर केले होते. जज असलेल्या आईच्या मुलाल पोलीस उचलतात कसे असे खवळलेल्या जया पाठक पतीसह तिथे दाखल झाल्या होत्या.या प्रकरणात त्यांनी काहीही न ऐकता  पोलिस स्थानकातच गोंधळ घातला आहे.  कॉन्स्टेबलने त्यांचा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करताच जया पाठक यांनी त्याच्या कानाखाली मारत  वर्दी फाडण्याचा प्रयत्न केला होता .


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

साडेचार कोटी रुपयांचे सोने फेकले विहरीत