Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डिटर्जंट पावडर मधून महिला करत होती सोन्याची तस्करी,पोलिसांनी ताब्यात घेतले

gold
, रविवार, 3 डिसेंबर 2023 (16:21 IST)
दुबईतून सोन भारतात आणतात. काही प्रमाणात दुबईतून सोनं भारतात आणता येते.दुबई सोन्याची किंमत भारतातून कमी आहे. त्यामुळे दुबईतून सोन आणण्याचा प्रयत्नात लोक असतात. या साठी काही लोक सोन्याची तस्करी करतात. सोन्याची तस्करी करणारे तस्करी करण्यासाठी वेगवेगळे आयडिया लावतात.

कधी सोन विग मध्ये लपवतात. तर कधी शरीरात देखील सोन लपवून आणले जाते तरीही कस्टम अधिकारी पकडतात. पण या वेळी एका महिलेने सोन्याची तस्करी करण्यासाठी जी युक्ती वापरली आहे ते पाहून  कस्टम अधिकारी देखील हैराण झाले. 
 
हैद्राबादच्या विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी सोन्याची तस्करी करणाऱ्या कडून 26 लाख 64 हजार रुपयांचं सोन पकडलं आहे. या प्रकरणात सोन्याचं पावडर केले असून हे पावडर डिजर्जेंट पावडरीत मिक्स करून आणले जात होते. 

तपासणीच्या वेळी कस्टम अधिकाऱ्यांना हे डिटर्जेंटच पाकीट सापडलं. त्यातील काही डिटर्जंट पावडर एका प्लेट मध्ये काढले आणि त्यात पाणी टाकले. बघता-बघता डिटर्जंट पाण्यात विरघळले आणि सोन्याचं पावडर तसेच राहिले. हे बघून कस्टम अधिकारी देखील अवाक झाले. या घटनेचा व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला असून तो वेगाने व्हायरल झाला.कस्टम अधिकाऱ्यांनी या महिलेला आणि सोन्याला ताब्यात घेतलं आहे.  . 

Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs AUS T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पाचवा T20 आज ,प्लेइंग 11 जाणून घ्या