हिंदू धर्मात यमराजला मृत्यू देव असे मानले गेले आहे परंतू तोच यम जेव्हा लोकांच्या प्राणांची रक्षा करण्यासाठी रस्त्यावर उतरला तर आश्चर्य वाटणे साहजिक आहे.
असेच काही दृश्य कर्नाटकाच्या हायटेक सिटी बंगळूरु येथे बघायला मिळाले, जेव्हा एक व्यक्ती यमराजच्या वेशभूषेत लोकांना रस्त्यावर सुरक्षित वाहन चालवण्यासाठी जागरूक करताना दिसला.
सुरक्षेसाठी बंगळूरु ट्रॅफिक पोलिसांद्वारे जागरुकता मोहीम चालवण्यात आली होती. पोलिस लोकांना हेल्मेट घालण्यासाठी प्रेरित करत होते आणि यासोबतच गुलाबाचे फूल देऊन सन्मानित करत होते.
या दरम्यान एक व्यक्ती यमराज लुकमध्ये दिसला. त्याने रस्त्यावर सुरक्षित चालणे व वाहन चालवताना हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला. यमराज लोकांसाठी कुतूहलाचा विषय ठरला.