Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

झाकीर नाईकविरोधात अजामीनपात्र वॉरंट

झाकीर नाईकविरोधात अजामीनपात्र वॉरंट
, शुक्रवार, 14 एप्रिल 2017 (11:50 IST)

वादग्रस्त मुस्लीम धर्मप्रचारक झाकीर नाईकविरोधात पीएमएलए कोर्टानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. आयसीसीस या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत करणे, धार्मिक भावना भडकावणे आणि मुलांचे ब्रेनवॉश करणे हे आरोप जाकीर नाईकवर ठेवण्यात आले आहेत. झाकीर नाईक याला इडीने चार वेळा चौकशीसाठी हजर राहण्याकरता समन्स बजावलं होते. पण झाकीर नाईक हजर न राहिल्याने शेवटी पीएमएलए न्यायालयानं आता झाकीर नाईक विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं. त्यातच झाकीर नाइक हा युएइमध्ये असल्याने आणि युएइ देशाशी भारताचे कायदेशीर पर्त्यार्पणाचे संबंध असल्याने हे वॉरंट परदेश मंत्रालयाच्यामार्फत युएइ सरकार आणि त्यानंतर जाकीर नाईक याला पाठवलं जाईल.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमेरिकेचा आयएसवर सर्वात मोठा हल्ला, काय म्हणाले ट्रंप...