मिग-29 या लढाऊ विमानाचा नाविक दलात नुकताच समावेश करण्यात आला. काही सेकंदात आपल्या लक्षाचा वेध घेण्याची क्षमता असलेले हे विमान आय.एन.एस. हंसा, वास्को-द-गामा, गोवा येथील नाविक दलाच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहे. संरक्षणमंत्री ए. के. एंटनी यांच्या उपस्थितीत या विमानाचा नाविक दलात समावेश करण्यात आला. हे विमान, जमीन आणि हवेतून मारा करण्यासाठी उपयुक्त आहे.
मिग-29 के सारख्या लढाऊ विमानांमुळे नौसेनेला मजबूती येणार असून नौसेना अधिकाधिक बळकटीसाठी आणखी विमाने समाविष्ट केली जाणार असल्याचे एंटनी यांनी सांगितले.