Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मी राजकीय झुंडशाहीचा 'बळी'- थरूर

मी राजकीय झुंडशाहीचा 'बळी'- थरूर
नवी दिल्ली , शनिवार, 3 एप्रिल 2010 (12:12 IST)
काही मुद्यांवर सार्वजनिक हिताच्‍या दृष्‍टीकोनातून जाहीर चर्चा होण्‍याची आवश्‍यकता असते ते खुलेपणाने मांडण्‍याचा माझा प्रयत्न सध्‍याच्‍या भारतीय राजकारणाच्‍या संस्‍कृतीत बसत नाही. त्यामुळे मला अडचणीत आणण्‍याचा आणि कमी लेखण्‍याचा काही लोकांचा प्रयत्न सुरू असतो. ही पध्‍दत बदलावी अशी माझी प्रामाणिक इच्‍छा आहे मात्र दुर्दैवाने त्‍यासाठी माझ्याकडे राजकीय पाठबळ किंवा अधिकार ही अशी जाहीर खंत परराष्‍ट्र राज्‍य मंत्री शशी थरूर यांनी व्‍यक्त केली आहे.

एका मुलाखतीत थरूर म्‍हणाले, की देशाची राजकीय संस्‍कृती झुंडशाही सारखी आहे. येथे नवीन विचार मांडणा-या आणि बाहेरून येणा-या समोर अनेक अडचणी उभ्‍या केल्‍या जातात. समाजातील काही लोकांना दुस-यांना कमी लेखणे आणि दाखवणे यात वेगळा आनंद मिळत असतो. माझ्याबाबत अशीच बाब झाली आहे. मी ही संस्‍कृती बदलण्‍याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने त्‍यात मला अपयश आले.

आपल्‍या काही शब्‍दांमुळे वाद निर्माण झाल्‍याचे मान्‍य करत थरूर यांनी आपल्‍याला राजकारणातील काही शब्‍दांचा खरा अर्थ समजण्‍यात अडचणी येत असल्‍याचे सांगितले.

सरकारी धोरणे ट्विट करण्‍याच्‍या आपल्‍या कृतीला योग्य ठरवत त्‍यांनी त्‍यासाठी ऑस्‍ट्रेलियाचे पंतप्रधान व ब्रिटन व अमेरिकेच्‍या परराष्‍ट्र मंत्र्यांचे उदाहरण दिले आहे. आपले म्हणणे साडेसात लाख लोकांपर्यंत पोचविणारे ते एक उपयोगी माध्‍यम असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi