अष्टभुजा नारायणीचा जागर,
आली त्याची वेळ, राहा तयार,
बसवून घट घरोघरी, लावा समई,
करा मनोभावे सेवा, प्रकटेल आई,
प्रत्येक नारीत वसे देवी मातृरूपे,
करा तिची स्तुती, आळविणे तिज सोपे,
नऊ दिस असे नवरात्र मायभवानी चे,
शक्तीचा महीमा किती गोडवे गाऊ तिचे!
पावेल आई माझी प्रत्येक भक्तास,
धावुनी येईल ती त्याच्या आर्त हाकेस,
चैतन्य निर्माण झाले अवती भोवती,
संचार शक्तीचा झाला या भुवरती!
...अश्विनी थत्ते