Chaitra Navratri 2023 हिंदू धर्मात, माता दुर्गा ही शक्तीची प्रमुख देवता आणि भगवान शिवची पत्नी म्हणून पूजली जाते. दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती काही ना काही प्रयत्न करत असते, परंतु नवरात्रीच्या काळात माता दुर्गेची पूर्ण भक्तीभावाने पूजा केल्यास ती प्रसन्न राहते आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देते. चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे, चैत्र नवरात्रीची सुरुवात 22 मार्च बुधवारपासून होणार आहे, यावर्षी चैत्र नवरात्र पंचकमध्ये सुरू होत आहे, हे पंचक 19 मार्च रविवार ते 23 मार्च गुरुवारपर्यंत सुरू होईल. हे पंचक चैत्र नवरात्रीच्या सुरुवातीनंतर फक्त 2 दिवसच राहणार असले तरी. हा पंचक रोग पंचक आहे.
चैत्र नवरात्रात पूजा पद्धत
दुर्गादेवीची उपासना करताना खऱ्या मनाची आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे. चैत्र नवरात्रीच्या सुरुवातीला सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्या घरातील पूजास्थानी गंगाजल टाकून त्याची शुद्धी करावी. घरातील मंदिरात दिवा लावावा. माता दुर्गेला गंगाजलाने अभिषेक करा. यानंतर अक्षत, सिंदूर, लाल रंगाची फुले देवीला अर्पण करा. प्रसाद म्हणून फळे आणि मिठाई अर्पण करा. धूप आणि दिवा लावून माता दुर्गा चालिसाचा पाठ करा आणि मातेची आरती करा. माताला अर्पण केलेला भोग इतरांना प्रसाद म्हणून वाटावा.
पूजा साहित्य
माता दुर्गेच्या पूजेसाठी काही विशेष पदार्थांची आवश्यकता असते, ती पुढीलप्रमाणे.
1. लाल चुनरी
2. लाल कपडे
3. मॉली
4. सौंदर्य प्रसाधने
5. दीपक
6. तूप
7. धूप
8. नारळ
9. अक्षत
10. कुमकुम
11. लाल फुले
12. देवीची मूर्ती
13. पान आणि सुपारी
14. लवंग
15. वेलची
16. बताशे किंवा मिश्री
17. कापूर
18. फळ
19. मिठाई
20. कलावा
शुभ मुहूर्त
या वर्षी नवरात्रीची सुरुवात शुक्ल योगात होणार आहे. जो सकाळी 9.18 पर्यंत चालेल. यानंतर ब्रह्मयोग होईल. हा योग सकाळी 9.19 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 पर्यंत राहील. या दिवशी ब्रह्मयोगानंतर इंद्र योगही होणार असून या समूहात माँ दुर्गेची पूजा करणे अत्यंत लाभदायक मानले जाते.
Edited by : Smita Joshi