Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

दुर्गा अष्टमी: या उपायांनी दुर्भाग्य दूर होईल सौभाग्य वाढेल

दुर्गा अष्टमी: या उपायांनी दुर्भाग्य दूर होईल सौभाग्य वाढेल
, शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019 (12:45 IST)
नवरात्रीच्या इतर दिवसांच्या तुलनेत दुर्गा अष्टमीचा दिवस काही विशेष महत्तवाचा असतो. या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते. तर जाणून घ्या या दिवशी अर्थातच अष्टमी तिथीला काय उपाय केल्याने दुर्भाग्य दूर होऊन सौभाग्यात वाढ होते.
 
1. अष्टमीच्या रात्री 12 वाजेनंतर आपल्या घराच्या मुख्य दारावर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. याने दुर्भाग्य दूर होतं.
 
2. कोणत्याही दुर्गा देवीच्या मंदिरात जाऊन 8 कमळाचे फुलं देवीला अर्पित करावे. याने देवी प्रसन्न होते.
 
3. या दिवशी कोणत्याही योग्य विद्वान गुरुजींकडून दुर्गा सप्तशती पाठ करवावा. घरात पाठ केल्याने सुख-शांती नांदते.
 
4. कोणत्याही कुमारिकेला तिच्या आवडीचे कपडे किंवा इतर वस्तू भेट म्हणून द्यावी.
 
5. 9 कुमारिकांना आपल्या घरी बोलावून भोजन करवावे. जेवणात खीर अवश्य बनवावी. कुमारिकांना भेटवस्तू द्यावी.
 
6. 11 सवाष्णींना लाला बांगड्या व कुंकु भेट म्हणून द्यावे. याने धन लाभ होण्याचे योग बनतात.
 
7. देवीच्या मंदिरात फळं जसे केळी, डाळिंब, सफरचंद इतर फळांचा नैवेद्य दाखवावा. नंतर गरीबांना दान करावे.
 
8. कोणत्याही देवीच्या मंदिरात श्रृंगाराची पूर्ण सामुग्री भेट द्यावी. याने समस्या सुटतात.
 
9. पाणी असलेलं नारळ डोक्यावरुन 3, 5, 7 किंवा 11 वेळा ओवाळून पाण्यात प्रवाहित केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात.
 
10. महागौरीच्या स्वरूपाला दुधाने भरलेल्या वाटीत विराजित करावे, त्यांना चांदीचा शिक्का अपिर्त करावा. नंतर शिक्का धुऊन नेहमीसाठी आपल्या खिशास ठेवावा. याने धन आपल्याकडे थांबेल. 
 
11. पिंपळाचे अकार पान घ्यावे. त्यावर राम नाम लिहावे. या पानांचे माळ तयार करुन हनुमानाला घालावी. याने सर्व प्रकाराच्या समस्या दूर होतात.
 
12. स्थिर लक्ष्मी प्राप्तीसाठी पानात गुलाबाच्या 7 पाकळ्या ठेवून दुर्गा देवीला अर्पित कराव्या.
 
13. पूजा करताना लाल रंगाचं कांबळ आसन म्हणून घ्यावर. त्यावर बसून पूजा करावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दसर्‍याला आपण सेवन करता का विडा ?