Festival Posters

नवरात्र विशेष : उपवासाची पुरी त्वरित बनवा फक्त या सोप्या पद्धतीने

Webdunia
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (09:53 IST)
नवरात्राचे उपवास असो किंवा इतर कोणतेही उपवास असो, नेहमी नेहमी तेच-तेच खाऊन कंटाळा येतो. साबुदाण्याची खिचडी, भगर, तेच पदार्थ खाऊन अक्षरश: वैताग आलेला असतो. त्यामुळे काही वेगळे खाण्याची इच्छा होऊ लागते. त्यासाठी नवीन काय बनवावं हा एक प्रश्नच असतो. काळजी नसावी, आम्ही आज आपल्याला सांगत आहोत उपवासाच्या पुऱ्या. ज्या चविष्ट तर असणारच पण करायला देखील अगदी सोप्या आहेत. 
 
साहित्य - 
2 वाटी राजगिऱ्याचे पीठ, 1/2 वाटी शिंगाड्याच पीठ, 1/2 वाटी शेंगदाण्याचं कूट, 4 ते 5 हिरव्या मिरच्यांची पेस्ट, 1 चमचा लाल तिखट, सैंधव मीठ चवीपुरती, बारीक चिरलेली कोथिंबीर, शेंगदाण्याचं तेल किंवा तूप तळण्यासाठी.
 
कृती -
* राजगिरा पीठ आणि शिंगाड्याच पीठ चाळून हलके गुलाबी रंग येई पर्यंत भाजून घ्या.
* एका ताटलीत हे दोन्ही पीठ घालून वरील सर्व साहित्य मिसळून कणीक मळावी आणि काही काळ तसेच ठेवावं.
* आता या कणकेचे गोळे करून पुऱ्या लाटून तेलात किंवा तुपात सोडून खमंग असे तळून घ्यावं. गरम राजगिऱ्याच्या पुऱ्या तयार.
* तयार गरम पुऱ्या हिरव्या चटणी किंवा दह्याच्या रायता सह सर्व्ह कराव्यात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

अक्षय तृतीयेला १० शुभ कार्ये करा, वर्षभर धनाचा वर्षाव होईल

Akshaya Tritiya 2026 : अक्षय तृतीया विशेष नैवेद्यात बनवा या पारंपरिक पाककृती

Parshuram Jayanti 2026 भगवान परशुरामांची जयंती १९ एप्रिल रोजी; मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

Akshaya Tritiya 2026 अक्षय तृतीयेला मीठ का खरेदी करावे?

Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेचे हे 5 गुप्त उपाय गरिबी दूर करतील

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

पुढील लेख
Show comments