नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा केली जाते. नवरात्रोत्सवात सर्वत्र वातावरण आल्हाददायक आणि आनंददायी असत.सर्वत्र नवरात्रोत्सवाची लगबग दिसते. नवरात्रोत्सव हे अश्विन शुक्ल पक्षात प्रतिपदेच्या तिथी पासून सुरु होऊन नवमी पर्यंत असते. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. नवरात्रात घटस्थापनेचे विशेष महत्व आहे.कलश स्थापना किंवा घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदा तिथीला केली जाते.घटस्थापनेला देवीचे रूप मानले आहे.देवी या कलशाच्या रूपात घरात आगमन करते.
यंदा सोमवार, 26 सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे. हे नवरात्र 4 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. घटस्थापना शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 26 सप्टेंबरला केली जाईल. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरातील मंदिरात कलशाची स्थापना करून देवी आईची प्रतिष्ठापना केली जाते. घटस्थापना शुभ मुहूर्तावर विधी विधानाने करावी. कलशाची स्थापना मंदिराच्या उत्तर-पूर्व दिशेला करावी. चौरंग ठेऊन कलशाची स्थापना करावी.
सर्व प्रथम गंगाजल शिंपडून ते स्थान पवित्र करा.
यानंतर पाट किंवा चौरंगावर कुंकुने स्वस्तिक बनवून कलश स्थापित करा.
पाटाच्या किंवा चौरंगाच्या आजू बाजूला रांगोळी काढा.
कलशात आंब्याचे पान ठेवून त्यात पाणी किंवा गंगाजल भरावे. एक सुपारी, काही नाणी, तांदूळ, दुर्वा ,हळकुंड एकत्र करून कलशात टाकावे.कलशाचा आठ ही बाजूनं हळदी-कुंकवाची बोटे ओढा.
कलशाच्यावर नारळ लाल कापडाने गुंडाळून ठेवा .
तांदळापासून अष्टदल बनवा आणि देवीचे टाक किंवा मूर्ती ताम्हण्यात ठेवा.
कलशाच्या स्थापनेबरोबरच एक अखंड नंदादीप प्रज्वलित केले जाते.
कलशाची स्थापना केल्यानंतर माँ शैलपुत्रीची पूजा करा.
हातात लाल फुले व तांदूळ घेऊन माँ शैलपुत्रीचे ध्यान केल्यानंतर मंत्राचा जप करून मातेच्या चरणी फुले व तांदूळ अर्पण करा.
माँ शैलपुत्रीचा भोग गाईच्या तुपापासून बनवावा. केवळ गाईचे तूप अर्पण केल्याने रोग आणि समस्यांपासून मुक्ती मिळते.
पूजेचे साहित्य -
हळद-कुंकू, नागलीची पाने, सुपारी, नारळ, दुर्वा, पाच फळे, कापसाची वात, चौरंग, तांदूळ, हळकुंड, देवीचे टाक किंवा मूर्ती किंवा फोटो. ज्वारी, किंवा गहू किंवा सात वेगवेगळे धान्य(मूग, मसूर, गहू, बाजरी, ज्वारी, हरभरा, तांदूळ), देवीची ओटी, अखंड नंदादीप. निरांजन, कापूर, उदबत्ती, धूपबत्ती, नैवेद्य.
घटस्थापना पूजाविधी-
आपल्या कुलदेवाचा किंवा नित्य पूजेच्या देवाच्या उजव्या बाजूस तांबड्या मातीची देवी करुन त्यावर शुद्धोदकानें भरलेल्या वा वारळ गोठण इत्यादि पवित्र ठिकाणीची माती आणूंन 7 प्रकारची धान्ये पेरतात. किंवा ज्वारी ,गहू घालतात. कलशाची स्थापना करुन त्यावर पूर्णपात्र ठेवून त्यात श्रीदेवीची मूर्ती किंवा तदभावी नारळ ठेवून पूजा वगैरे करणे याला घटस्थापना असे म्हणतात. ही पहिल्या दिवशी करुन नऊ दिवस तो घट तसाच ठेवायचा असतो.
वेदांची प्रार्थना
वेदीला हात लावून मंत्र म्हणावा-
ॐ मही द्यौ: पृथिवी च न ऽइमं यज्ञं मिमिक्षताम । पिपृतान्नो भरीमभि: ॥
पूर्णपात्र म्हणजे ताम्हणात तांदूळ भरुन ते पात्र कलशावर ठेवणे
हे ठेवताना मंत्र म्हणावा-
ॐ पूर्णादर्विपरापत सुपूर्णा पुनरापत ।
वस्नेव विक्रीणा वहाऽइषमूर्ज शतक्रतो ।।
या प्रमाणे कलश स्थापना झाल्यावर त्या कलशावर कुंकवाने अष्टदल काढावे. आणि ''श्रीवरुणाय नम: सकलपूजार्थे गंधाक्षत-पुष्पं समर्पयामि'' असे म्हणून त्या घटाला गंध-फुल-अक्षता वहाव्या.
यानंतर त्या पूर्णपात्रामध्ये देवीची किंवा आपल्या मुख्य कुलदेवाची मूर्ती ठेवावी. तसे शक्य नसल्यास त्या कलशावर नारळ ठेवावा म्हणजे हे देवतास्थापन पूर्ण झाले.
अंकुरारोपण
घटस्थापना झाल्यावर त्या घट किंवा कलशाभोवती बारीक तांबडी माती पसरावी आणि त्या मातीत नवधान्य-भात, गहू, जोंधळे, मका, मूग, हरभरे इत्यादी परावे आणि पुन्हा माती पसरवावी. यावेळी म्हणवाचये मंत्र
हे मंत्र म्हणून त्यावर पाणी शिंपडावे. अंकुर पिवळा येण्यासाठी हळदीचे पाणी करुन शिंपणे किंवा मूळ धान्यच हळदीच्या पाण्यात थोडा वेळ भिजत घालून नंतर रुजत घालावे.
घटप्रार्थना
धान्य रुजत घातल्यावर घटप्रार्थना करताना म्हणावयाचे मंत्र-
घटस्थापना केल्यावर नऊ दिवस कलशावर माळ बांधतात. दररोज एक एक माळ बांधायची आहे. दररोज देवीची आरती करावी आणि कुटुंबात सर्वांचे मंगल होवो अशी कामना करावी.
नवरात्रात पूजेचे नियम -
* अश्विन शुक्ल प्रतिपदेला ब्रह्म मुहुर्तात स्नान करावे.
* घरातील कोणत्याही पवित्र जागेत स्वच्छ मातीने वेदी बनवावी.
* वेदीत जव आणि गव्हाचे दाणे मिसळून पेरावे.
* वेदीवर किंवा त्याचा जवळच्या पवित्र जमिनीची पूजा करावी आणि त्या ठिकाणी सोनं, चांदी, तांबा किंवा मातीचे घट स्थापित करावे.
* या नंतर त्या कलशात किंवा घटात आंब्याचे पानं, दुर्वा आणि पंचामृत टाकून त्याच्या तोंडाला पवित्र सूत्र बांधावे.
* कलश किंवा घट स्थापनेनंतर गणपतीची पूजा करावी.
* या नंतर वेदीच्या बाजूने देवी आईची कोणतीही धातू, दगड, माती आणि तसवीरीची विधी-विधानाने स्थापना करावी.
* नंतर मूर्तीचे आसन, पाद्य, अर्ध, आचमन, स्नान, कापड, गंध, अक्षत, फुले, धूप दिवा, नैवेद्य, आचमन, पुष्पांजली, नमस्कार आणि प्रार्थना करून पूजा करावी.
* दुर्गा सप्तशतीचा पाठ आणि दुर्गा स्तुती करावी.
* पाठाचे वाचन केल्यावर दुर्गेची आरती करून प्रसाद वाटप करावा.
* कन्यांना जेवण द्या. नंतर स्वतः फळे खा.
प्रतिपदेपासूनच घरात जव पेरण्याचा विधान आहे. नवमीच्या दिवशी हे जव डोक्यावर ठेवून एखाद्या नदी किंवा तलावात विसर्जित करावे. अष्टमी आणि नवमी या महातिथी असतात. या दोन्ही दिवसात पारायण केल्यावरच हवन करावे आणि आपल्या सामर्थ्यानुसार सवाष्ण ,ब्राह्मण ,कुमारिकांना जेवायला द्यावं.