वर्षभरात चार वेळा नवरात्री येते. यामध्ये दोन या गुप्त नवरात्री असतात ज्या आषाढ आणि माघ महिन्यात येतात. तर इतर दोन नवरात्री या चैत्र आणि शारदीय महिन्यात येतात. सर्व नवरात्रींसह चैत्र नवरात्रीचं देखील खूप महत्त्व असतं. ही नवरात्र गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत असते. या नवरात्रीत देखील घट स्थापना होते तसेच अनेक भक्त व्रत ठेवतात. या दरम्यान काही नियम पाळायचे असतात तर जाणून घ्या चैत्र नवरात्रीत काय करावे आणि काय टाळावे-
नवरात्रीत काय करावे
1. दररोज देवीची पूजा करावी. मंदिरात जाणं शक्य नसल्यास घरीच देवीचं ध्यान करावं. याने कुटुंबातील लोकं प्रसन्न राहतात.
2. देवीला जल अर्पित करावे. शास्त्रांप्रमाणे दररोज स्वच्छ जल देवीला अर्पित करावे. याने देवी प्रसन्न होते.
3. नागड्या पायाने राहावे. या दरम्यान स्वच्छ कपडे धारण करावे.
4. नऊ दिवस उपास करावा. याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं. उपास करणे शक्य नसल्यास सात्विक राहणे महत्त्वाचे आहे.
5. नऊ दिवसांपर्यंत देवीचा विशेष श्रृंगार करावा. श्रृंगारात साडी, फुलांची माळ, हार, नवीन कपडे देवीला अर्पित करावे.
6. अष्टमीला विशेष पूजा करावी आणि कन्या भोज करवावे. या दिवशी ब्राह्मणाकडून देवीचा पाठ करवावा किंवा स्वत: पाठ करुन ध्यान करावं.
7. या दरम्यान अखंड ज्योत लावावी. अखंड ज्योत गायीच्या तुपाने लावल्यास देवी प्रसन्न होते.
8. ब्रह्मचर्य व्रत पालन करावे.
नवरात्रीत आपण व्रत करत नसला तरी नऊ दिवसापर्यंत ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे.
नवरात्रीत काय करु नये
1. नवरात्रीत फोडणीचे पदार्थ किंवा मसालेदार भोजन ग्रहण करु नये.
2. उपास करत नसला तरी जेवणात लसूण-कांदा वापरु नये.
3. या दरम्यान नखं आणि केस कापू नये.
4. मांस-मदिराचे सेवन करु नये.