Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय १४

श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय १४
, शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (18:15 IST)
श्रीगणेशायनमः ॥ अंबामानंदसंदोहांसदोलाधिष्ठितांस्मर ॥ सखीसम्वीज्यमानासच्चामरैवामरैर्नुतां ॥१॥
षण्मुखस्वामीकार्तिकासी ॥ आदरेंपुसतेझालेऋषी ॥ तुम्हींवर्णिलेंआम्हासी ॥ जगदंबेचें चरित्र ॥२॥
परममंगलादेवता ॥ मातंगीनामेंवर्णिलीसर्वथा ॥ परीतिचेंस्वरूफतत्त्वतां ॥ कळेलेंनाहींआम्हासीं ॥३॥
तीत्वरितादेवीचीअन्यशक्ति ॥ कींस्वयेजगदंबाचाअदिमुर्ती ॥ किंवायोगिनीकींचामुंडाशक्ति ॥ कींमात्रुकाअथवारेवती ॥४॥
किमर्थभिन्नरूपेंस्थित ॥ झालीतेंसांगाइत्यंभृत ॥ स्कंदम्हणेऐकासमस्त ॥ मातंगीअरित्रातिथोर ॥५॥
तुरजाभक्तवत्सलमाऊली ॥ ज्यास्तवमातंगीनामपावली ॥ तीकथासांगतोंभली ॥ ऐकातुम्हीऋषीअवधे ॥६॥
मातंगनामाराक्षसेश्वर ॥ महाबलपराक्रमीथोर ॥ तेणेंगांजिलेसुरवर ॥ मुनीगंधर्वद्विजसिद्ध ॥७॥
गायीमनुष्यपीडिलेफार ॥ सर्वासीकरूनबलात्कार ॥ देवाच्यास्त्रियारत्‍नेंअपार ॥ नेताझालापापीतो ॥८॥
राजकन्याराजस्त्रिया ॥ ब्राह्मणकन्याब्राह्मणाजाया ॥ नागौरगाच्याकन्यास्त्रिया ॥ हरित्यतेणेंराक्षसें ॥९॥
रत्‍नजातिजितुकेंपृथ्वींत ॥ तोपापीतितुकेंहिरोनीनेते ॥ ऋषिच्यायागकालीत्वरित ॥ ब्राह्मणरूपधरीनी ॥१०॥
यागमंडथींप्रवेशत ॥ अग्निसीनसुनीटाकीत ॥ ऋषिजनांसीमारूनिभक्षीत ॥ मांसत्याचेंकाढोनी ॥११॥
होमद्र्वयांतापवित्रपदार्थ ॥ अमेद्यमिसळोनीनाशकरित ॥ यज्ञपात्रघेऊनीसमस्त ॥ चिताग्नींतजाळीत स्मशानी ॥१२॥
यज्ञाचेभागसमस्त ॥ आपणस्वतःअसेघेत ॥ देवबाहेरघातलेत्वरीत ॥ स्वर्गीतुनीतयानें ॥१३॥
इंद्राअग्नियमवरूण ॥ नैऋत्यवायूसोमाईशान्य ॥ यांचेअधिकारस्वतःआपण ॥ चालवूंलागलातेधवां ॥१४॥
सौरचांद्रमासाअश्विनस्थान ॥ याचाअतिक्रमकरोन ॥ लोकांसपीडाकरी दारूण ॥ दुष्टपापिष्टाराक्षसतो ॥१५॥
त्याचेजेराक्षसबळी ॥ यथेष्टाहिंडतीपृथ्वीतळीं ॥ मायिकरूपेंधरोनी वेगळीं ॥ लेकुरेंभक्षितीमनुष्याची ॥१६॥
जीमातेच्यामांडीवरीखेळतीं ॥ त्यासीउचलोनीतेथेंचभक्षिती ॥ ऐसेंदेवमनुष्याप्रती ॥ दुःखादेतीबहुसाल ॥१७॥
हेंपाहूनसर्वसुरगण ॥ ब्रह्मयासीगेलेशरण ॥ राक्षसांचेंदुराचरण ॥ निवेदितीब्रह्माया ॥१८॥
म्हणतीमातंगेंपीडिलेबहुत ॥ त्याचेराक्षसबहुउन्मत्त ॥ तेलोकांचाकरितीघात ॥ यज्ञादिधर्मउच्छेदिले ॥१९॥
ऐकोनदेवांचेंभाषण ॥ तेव्हांविधातालोकभावन ॥ मधुरसामपूर्वकवचन ॥ बोलताझालादेवासी ॥२०॥
तुम्हीकथिलेंजेवृत्त ॥ तेंमजाआधींचाअहेविदित ॥ मातंगराक्षसेंत्रिभुवनांत ॥ सर्वलोकांसपीडिले ॥२१॥
दुःखनाशकउपायपूर्ण ॥ तुम्हासीमीसांगतोंजाण्ड ॥ जगदबेसीजवेंशरण ॥ सर्वऋषींसघेऊनी ॥२२॥
जीशरण्यावैष्णवीमांता ॥ शिवातुरजादेवीत्वरिता ॥ जभिक्तकामकल्पलता ॥ यमुनापर्वतींवसताहे ॥२३॥
तुमच्यादूःखाचापरिहार ॥ तीचकरौलहानिर्धार ॥ तिजविणकोनीनसेइतर ॥ वधावयात्यादुष्टा ॥२४॥
माझ्यावरेंतोदुष्टदुर्मती ॥ अवध्यझालासर्वांप्रती ॥ हरीहरहीवधूंनशकती ॥ एकजगदंबेवांचूनी ॥२५॥
शंकरम्हणेब्रह्मावचन ॥ ऐकोनियादेवगण ॥ ब्रह्मायासीननमस्कारकरुन ॥ यमुनाचालासीआलेवेंगें ॥२६॥
देवीसन्मुखयेऊन ॥ भावेंघातलेंलोटांगण ॥ उभेराहिलेकरजोडून ॥ स्तवनकरूंलागले ॥२७॥
श्लोक ॥ देवाऊचः ॥ नमोनमस्तेत्र्यंबकेशिवेत्रैलोक्यसंत्राणकृतावतारे ॥ त्रिविष्टिपैरचिंतपादपीठे त्रिधात्रिवैद्याद्युपगीयमान ॥१॥
टीका ॥ नमोनमस्तेत्र्यंबके ॥ शिवेत्रैलोक्यरक्षके ॥ कृतावतारेजगदंबिके ब्रह्मादिदेवापूज्यतूं ॥२८॥
तुझेंपादपीठपवित्रउत्तम ॥ आम्हादेवासीपुज्यपरम ॥ त्रिधात्रिकांडप्रकारें निःसीम ॥ ऋग्यजुःसामतुजगाती ॥२९॥
आदिकरोनीस्मृतीपुराण ॥ अगभगातीतुजलागुन ॥ अवतारघेऊनसाधुरक्षण ॥ धर्मवृद्धिकरिसीतूं ॥३०॥
श्लोक ॥ गुणैस्त्रिभिर्लोहितशुक्लष्णैरुप्तत्तिस्यपरंनिधानं ॥२॥
टीका ॥ लोहितशुक्लाआणिकृष्ण ॥ रजःसत्वतमत्रिगुण ॥ याचास्वीकारकरून ॥ सृष्टिस्थितीलयकरिसीतु ॥३१॥
निमित्तकारणकेवळनव्हेसी ॥ उपादानकारणतूंचआहेसी ॥ तुंआद्याप्रकृतीपुराणाअससी ॥ जुनाटपरीनित्यनवी ॥३२॥
परिणामरहिताव्ययवीज ॥ याविश्वाचेंतूंचसहज ॥ चेतनाचेतनविश्वानिर्व्याज ॥ तुझेंस्वरूपींउद्भवें ॥३३॥
तेपुन्हांतुझेठायीं ॥ लयपावतसर्वही ॥ तस्माततूंएकपही ॥ अबाधिताद्वय ॥३४॥
विश्वभासेअसतेनासे ॥ सुर्यकिरणींमृगजळजैसे ॥ त्वदुपाआहेतैसेंअसे ॥ सूर्यजैसात्रिकाळीं ॥३५॥
श्लोक ॥ भूतेंद्रियार्थाविविधाश्चलोके ॥ यागादिकर्मेंद्रियवृत्तयश्च ॥ प्राणीमनोबुद्धिरहंकृतीश्च ॥ प्रज्ञास्मृतीर्मोहवितेचनाच ॥३॥
कोशाश्चचक्राणिच वायुमार्गयेधातवोसप्तविधाश्चमातः ॥ परस्परंहेतवएवंदहेत्वयानुवृत्तींगमिताश्चतुविधें ॥४॥
टीका ॥ भूतेंद्रियार्थाधराजलतेजवायुगगन ॥ श्रोत्रत्वकचक्षुजिव्हाघ्राण ॥ शब्दस्पर्शरूपरसगंधजाण ॥ भूतेंद्रियअर्थम्हणावे॥३६॥
भुतसत्वांशेंश्रोत्रादिइंद्रिय ॥ भूततमांशेंशब्दादिविषय ॥ भूतरजांशेंकमेंद्रिय ॥ वाकपाणीपादशिश्नगुद ॥३७॥
याच्यावृत्तीवचनादान ॥ गमनानंदविसर्गकरण ॥ शरीरगतवायुप्राण ॥ कल्पनातेंचमनहोय ॥३८॥
निश्चयरूफबुद्धिव्रृती ॥ अभिनिवेशतीअहंकृती ॥ अनुसंधानप्रज्ञावृत्ती ॥ चित्तत्यासीम्हणावें ॥३९॥
अनुमवलेविषय आठविती ॥ तेचीजाणावीकेवळस्मृती ॥ मोहम्हणजेपडेभ्राती ॥ विवेचनम्हणजेविवेक ॥४०॥
ऐसेभुतभौक्तिकविचार ॥ त्याचेंघडलेंहेंशरीर ॥ त्याचेहीतीनप्रकार ॥ स्थुलसुक्ष्मकारण ॥४१॥
यातकल्पिलेपंचकोशविशद ॥ अन्नप्राणम्नविज्ञाननंद ॥ याचेंस्वरुप यथाविध ॥ आहेतैसेंजाणावें ॥४२॥
पंचीकृतपंचभुतांचे ॥ परिणामसप्तघातूंचे ॥ घडलेंस्थळशरीरत्याचेंनामअन्नमयकोश ॥४३॥
पंचप्राणकमेंद्रिय ॥ मिळोनप्राणमयकोशहोय ॥ मनाआणीज्ञानेंद्रिय ॥ तोकोशमनोमय ॥४४॥
तेचिज्ञानेंद्रियेंबुद्धीसहित ॥ विज्ञानमयकोशहोत ॥ ऐसेंकोशत्रययुक्त ॥ सुक्ष्मशरीरजाणावें ॥४५॥
तिसरेंकारणशरीर ॥ त्यांताअनंदमयकोशानिर्धार ॥ तेंसुषुत्पोंचेमेंदिर ॥ जेथेंअनुभवसुखाचा ॥४६॥
शरीरत्रयकोशपंचक ॥ हेअसताएकांतएक ॥ हेसर्वहीरहतीएक ॥ स्थूळदेहामाझारीं ॥४७॥
सप्तधातूचेंस्थूळशरीर ॥ रोमत्वचनाडीरुधिर ॥ अस्थिमांसमज्जाप्रकार ॥ सप्तधातूंचेंस्थूळहें ॥४८॥
षड्‍चक्रसीआंधार ॥ हेंचिअसेस्थळशरीर ॥ भृकंठहृदयनाभीद्वारा ॥ गुदलिंगगुदमिळोनी ॥४९॥
वायुमार्गाइडापिंगळा ॥ सुषुम्नादिनाडींचामेळा ॥ जागृतिआदिव्यापारसकळा ॥ परस्परहेतुहेंसर्व ॥५०॥
इंद्रियविषयदेव॥ प्रसिद्धएकमेकास्तव ॥ कैसेसमजावेंयास्तव ॥ उदाहरणएकदाखवूं ॥५१॥
सूर्यप्रकाशेंसामर्थ्यनेत्रांसी ॥ तेव्हानेत्रपाहेघटासी ॥ घटास्तवप्रसिद्धनेत्रांसी ॥ नेत्रास्तवसुर्यप्रसिद्ध ॥५२॥
ऐसेपरस्परसापेक्षसतत ॥ अध्यात्माअधिदैवाअधिभूत ॥ हेतिन्हीमिळोनीव्यवहारहोत ॥ जागृतींतप्रत्यक्षें ॥५३॥
एवंअव्यक्तादिशरींरांत ॥ प्रपंचविस्तारलाबहुत ॥ हेंजडसर्वहीयासींकिंचित ॥ सत्तातुजविणनसेकांहीं ॥५४॥
मृगजळासीस्वतंत्रता ॥ सूर्यावांचुननाहीसर्वथा ॥ कार्यकारणप्रपंचता ॥ तुजवीणसत्यतानसेची ॥५५॥
तुझ्याअनुवृत्तीनेंभासे ॥ एरवीहेंकांहीनसे ॥ मृत्तिकेविणनसेंजैसें ॥ भूगोलकार्णघटकार्या ॥५६॥
सविकारप्रपंचत्रिविध ॥ तुझेस्वरूपीभासलाविविध ॥ उपाधीस्तवंतूहीत्रिविध ॥ शवलस्वरूपभाससी ॥५७॥
निरूपादिरूपशुद्ध ॥ ज्यासीम्हणतीसच्चिदानंद ॥ रूपतुझेंचतुर्विध ॥ यास्तवासेजगदंबे ॥५८॥
श्लोक ॥ त्वंवैप्रसन्नाभुविमुक्तिहेतुरत्त्वयाजगत्सर्वमिदंविराजते ॥ त्वयाविनाकिंचन्नास्तिमास्त्वंमुक्तीदात्रीपरमामुनीनां ॥५॥
टीका ॥ याभुलोकींतूंप्रसन्न ॥ होसीमुक्तीसीकारण ॥ जीवअज्ञानकमेंकरून ॥ नानायोनीफिरतसे ॥५९॥
अकस्मातपावलामनुष्ययोनी ॥ स्ववर्णाश्रमधर्माआचरोनी ॥ निष्कामतुझ्यालागलाभजनीं ॥ तेणेंतूंप्रसन्नजगदंबा ॥६०॥
तुझ्याप्रसादेंशुद्धचित्त ॥ विषयविरागीअध्यात्मरत ॥ गुरुशास्त्राचालाभत्वरीत ॥ निर्विघ्नहोततयाला ॥६१॥
विघ्नाअलीयातुंटाळीसी ॥ योगक्षेमचालविसी ॥ प्रसन्नतुंकारणहोसी ॥ मुक्तिलागींतयच्या ॥६२॥
अस्तिभातीप्रीयता ॥ सर्वास्तुंततुझीतत्वतां ॥ तेणेंनामरूपात्मकजागता ॥ शोभाविशेषविराज ॥६३॥
याजगांतपाहतांकांही ॥ तुजविणान्यनसेपाही ॥ नामरुपश्रमसोडोनीजेही ॥ तुझेंस्वरुपक्षिती ॥६४॥
तेमननशीलमुनी ॥ त्याचाकर्मप्रतिबंधतोडोनी ॥ मुक्तिसीदेसीतूंनिर्वाणी ॥ तुंचजननीजगाची ॥६५॥
श्लोक ॥ स्पष्टंत्वयायशुचितांलभेतत्यक्तं ॥ त्वयावद्यशुचिहमातः ॥ त्वददृष्टिपातामृतवृष्टिवार्षिभिस्तुत्यंभवेल्लोष्टतृणंचकाष्ठ ॥६॥
मातेत्वांस्पर्शिलेंजयासी ॥ पवित्रतालाभेतयासी ॥ जगदंबेत्वात्यागिलेंज्यासी ॥ तेहोयअपवित्र ॥६६॥
तुझीदृष्टिपातामृतवृष्ती ॥ वर्षेलज्यावरीतोहोयसृष्टि ॥ स्तुतीसीपात्रपरमेष्टी ॥ प्रभृतीसर्वदेवास ॥६७॥
लोकतृणकींअसोकष्ट ॥ तेंहोयसर्वासपुज्यश्रेष्ठ ॥ कॄपादृष्टीनेंआमुचेकष्ट ॥ दुरकरीहोजगदंबे ॥६८॥
श्लोक ॥ यस्थालयेत्वंप्रक रोषिवांस ॥ स्तुत्यः ॥ सलोकत्रयपुजितश्च ॥ त्वयाविनानास्तिशरीरभाजांसवित्प्रदात्रिगुणवृत्तीयोगात ॥७॥
टीका ॥ सर्वजगांततुझानिवास ॥ तुजविनाकिंचितनसेवोस ॥ परीतेंनकळेअज्ञानास ॥ जाणतीज्ञानीभक्ततुझे ॥६९॥
भक्तप्रेमेंतुजलाध्यातीं ॥ तुझ्याप्रतिमाकरोनीपुजित ॥ तेथेंचतुझीअभिव्यक्ति ॥ होतसेकेवळजगदंबे ॥७०॥
प्रकर्षेकरोनीभक्तिमंदिरीं ॥ निवासकरिसीनिर्धारीं ॥ यास्तवत्र्यैलोक्याभीतरीं ॥ पूज्यस्तुत्यभक्ततो ॥७१॥
शरीरधारीसर्वजीवांसी ॥ बुद्धिदात्रीतुंचअससी ॥ परिबुद्धिवृत्तीभिन्नत्वासी ॥ त्रिगुनयोगेंपावती ॥७२॥
सात्विकबुद्धिचेजेंजन ॥ तेतुझेंकरितीध्यानपुजन ॥ राजसविषयाभिलाषिपूर्ण ॥ हिंसाकरितीतामस ॥७३॥
राजसतामासाकरोनीदमन ॥ सन्मार्गालाविसी त्यालागुन ॥ सात्विकाचेंपरिपालन ॥ सर्वदाकरसीजगदंबा ॥७४॥
श्लोक ॥ पूर्वत्वयायत्पारिपालितं जगद्धत्वासुरानशुंभनिशुंभमुख्यान इंद्रादयस्वर्गपदेषुसक्तात्वमेवमाताजगतोखिलस्य ॥८॥
टीका ॥ पूर्वी शुंभनिशुंभाअदिकरुन ॥ दैत्यदानवसंहारून ॥ सर्वजनाचेंपरिपालन ॥ केलेंत्वांचजगदंबे ॥७५॥
इंद्रादिदेवांचेगण ॥ स्वर्गपदीकेलेंस्थापन ॥ सर्वाचेंकारिसीपरिपालन तुंचजननीसर्वांची ॥७६॥
शंकर म्हणेदेवीभगवती ॥ सिंहवाहिनीतुरजाशक्ति ॥ तिचीदेवांनीकरुनीस्तुती ॥ पुजितेझालेआदरें ॥७७॥
पारिजातपुष्पेंकरुणी ॥ देवीसीपुजितीनम्रहोऊनी ॥ प्रसन्नहौनीभवानी ॥ वचनबोलतेदेवासी ॥७८॥
हेदेवगणसमस्त ॥ तुम्हांसीमीप्रसन्नाअहेंनिश्चित ॥ वरमागामनोवांच्छित ॥ इच्छिलेंतेंदेईनतुम्हासी ॥७९॥
देवम्हणतीमातंगराक्षस ॥ मातंगपर्वतीत्याचारहिवास ॥ त्यानेंदिधलाबहुतत्रास ॥ स्थानभ्रष्टकेलेंआम्हासी ॥८०॥
स्त्रियांसीरत्‍नसंचयासी ॥ घेऊनगेलातोपापराशी ॥ यागस्थानीजातवेगेंसी ॥ विध्वंसितसेसर्वकर्म ॥८१॥
मुनीमानवगायीगंधर्व ॥ यक्षपन्न्गादिजीव ॥ त्याचेअधिकारहरोनी सर्व ॥ दुःखीकेलेंसकळासी ॥८२॥
म्हणोनीआलोआम्हींयेथ ॥ अंबेतुजसीशरणांगत ॥ कॄपेनेंआमुच्यारक्षणार्थ ॥ दुष्टराक्षसासवधावें ॥८३॥
स्कंदम्हणेयाप्रकारचें ॥ बोलणेंऐकूनदेवाचें ॥ भयभीतझालेतयाचे ॥ समाधानकरुनीबोले ॥८४॥
म्हणेमारीननिश्चयेंमतंगासी ॥ राक्षसाधमपापीयासी ॥ तुम्हींजावेंस्वर्गलोकासो ॥ ग्लानीभयसोडोनी ॥८५॥
शंकरम्हणेअभयवाणी ॥ देवासी देउनीत्वरिताजननी ॥ सिंव्हावरीआरुढहोउनी ॥ योगिनीवृंदसमवेत ॥८६॥
जातीझालीपर्वतास ॥ जेथेंपापीतोराक्षस ॥ तेथेंजाउनीसिंहनादास ॥ उच्चस्वरेंकरितसे ॥८७॥
वारंवारसाटहास ॥ हाकफोडीतबहुवस ॥ करोनीघनुष्यटणत्कारास ॥ सिंहनादासमवेत ॥८८॥
नादेंकोंदलेंदिग्मंडळ ॥ दणाणलें धरणीतळ ॥ नादाइकोनतुंबळ ॥ मातंगराक्षसत्याकाळीं ॥८९॥
वेगेंनिघालाधांवत ॥ आदिशक्तिअसेजेथ ॥ सिंहारुढविराजित ॥ सत्वराअलात्याठायी ॥९०॥
त्यापाठीसीत्याचेसैनिक ॥ वाहनासहनिघालेकंटक ॥ संग्रामहोणारतेंकथानक ॥ सविस्तरपुढेंआहे ॥९१॥
जगदबाकृपेनेंव्याख्यान ॥ पांडुरंगजनार्दन ॥ करीलतेंऐकोनसज्जन ॥ भाविकाआदरेंकरोनी ॥९२॥
इतिश्रीस्कंदपुराणे ॥ सह्याद्रीखंडेतुरजामहात्म्ये ॥ शंकरवरिष्ठसंवादे चतुर्दशोध्यायः ॥१४॥
श्रीजगदंबार्पणमतु ॥ शुभंभवतु ॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गणपती आणि संगीत, या नात्याबद्दल रोचक माहिती