Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय ३३

Webdunia
सोमवार, 25 जानेवारी 2021 (08:14 IST)
श्रीगणेशायनमः ॥ जयकरुणामूर्तीजगदंबिके ॥ विश्वव्यापकविश्वचाळके ॥ नमोब्रह्मांडनायके ॥ त्र्यंबकेतुजनमो ॥१॥
श्रोतेऐकाविचक्षण ॥ पूर्वाध्यायीनारायण ॥ स्वामयेंनेंमोहितकरुन ॥ बोलताझालादैत्यासी ॥२॥
हेंमुळव्यासवचन ॥ तेहतीसव्याश्लोकींजाण ॥ मोहशब्दाचेंकेलेंव्याख्यान ॥ दैत्यभावगर्वितम्हणोनी ॥३॥
पुन्हांनिरुपणच्याश्लोकींजाण ॥ मोहशब्दाचेंव्याख्यान ॥ अपकिर्तीपरिसश्रेष्ठमरण ॥ मानिताझालादैत्यनाथ ॥४॥
गरुडानेंयुद्धीकेलाजर्जर ॥ तोअपमान वाटलादैत्यासीथोर ॥ देहाचाकरुनीतिरस्कार ॥ मुक्तिमागेलदेवासी ॥५॥
मोहशब्ददोनवेळा ॥ वेदव्यासेंपुराणींलिहिला ॥ त्याचाअभिप्रायतुम्हांला ॥ कळविलायथामतीनें ॥६॥
जैसाकाट्यानेंकाटा काढिला ॥ तैसामोहानेंमोहनिगसिला ॥ धारासुरविष्णुभक्तभला ॥ कॄतार्थकेलाभगवंतें ॥७॥
हें तात्पर्यमगीलकथेचें ॥ संकेतेंकळाविलेंतुम्हासांचें ॥ आतांयेथुनपुढीलकथेचें ॥ श्रवणकराआदरें ॥८॥
विष्णुम्हणेधारासुरासी ॥ तंभुक्तदृढव्रतुजसी ॥ प्रसन्नझालोंमागवरासी ॥ इच्छिसीतेंदेईनमी ॥९॥
जेंदुष्करदुर्लभदेवासी ॥ तेंआजदेईनतुजसी ॥ दैत्यम्हणेभगवंतासी ॥ जरीप्रसन्नाअहेसीमजदेवा ॥१०॥
तूंत्र्यैलोक्यगुरुव्यापका अससी ॥ अंतर्यामींउपदेष्टाहोसी ॥ तरीसायुज्यद्यवेंमजसी ॥ पुनरावृत्तिरहितजे ॥११॥
माझादेहावरीअंबिकेसाहित ॥ त्वांदेवाधिदेवाव्हावेंसुस्थित ॥ तिक्ष्णधारचक्रानेंत्वरित ॥ छेदुनीटाकीशरीरमाझें ॥१२॥
तुझ्यावरणीमाझ्याप्राणा ॥ लयहोऊंदेत्र्यैलोक्यभुषणा ॥ माझ्यानामानेत्र्यैंलोक्यपावना ॥ प्रसिद्धहोवोक्षेत्रहें ॥१३॥
मजवरीअनुग्रहकरुन ॥ हेंचद्यावेंमजवरदान ॥ स्कंदम्हणेदैत्यवचन ॥ ऐकोनीतेव्हांविष्णुनें ॥१४॥
सुदर्शनचक्रानेंतेवेळे ॥ धारसुराचेंमस्तकछादलें ॥ जेंप्रदीप्तकुंडलेंशोभलें ॥ तैसेंचछेदिलेंबाहुदोन्हीं ॥१५॥
वक्षस्थळासीछेदुनी ॥ मध्यभागहीटाकिलाछेदोनी ॥ दैत्यतेव्हांपडिलाधरणीं ॥ सर्वगात्रोम्छिन्नझालीं ॥१६॥
पाहुनीदेवैद्रप्रमुख ॥ विष्णुसीबहुधास्तवितीदेख ॥ पुष्पवृष्टिकरितीअनेक ॥ धरणीवरीतेवेळीं ॥१७॥
देववाद्यांचागजरहोत ॥ अप्सरानृत्यकरितीबहुत ॥ पुण्यसुगंधवायुवाहत ॥ सुप्रभायुक्तसुर्यझाला ॥१८॥
निर्मळसर्ववस्तुजात ॥ तेकाळींझालेयथास्थित ॥ ऋषीमंडळीसकथासांगत ॥ स्कंदशिवपुत्राअदरें ॥१९॥
धारासुरासीयमुनापर्वतीं ॥ मारुनत्याच्यादेहाप्रती ॥ मथनकरोनीभोगावती ॥ नदीनीर्मिलीविष्णुनें ॥२०॥
शरीराचेंनामभोग ॥ त्यासीसमनकरुश्रीरंग ॥ जलनिर्मिलेंअव्यंग ॥ यास्तवभोगावती नामत्यासी ॥२१॥
तीभोगावतीपश्चिमवाहिनी ॥ तिच्याकेवळ उद्गमस्थानीं ॥ लक्ष्मीसहितचक्रपाणी ॥ राहिलाभगवानकमलेक्षण ॥२२॥
सर्वदेवांचाईश्वर ॥ अनुरहकरावयालोकांवर ॥ रम्यभोगावतीतीर ॥ अधिष्ठुनिराहिला ॥२३॥
ऐसेइयाप्रकारेंदेवोत्तम ॥ मारुनियांदैत्योत्तम ॥ त्र्यैलोक्यपावनसर्वोत्तम ॥ स्वयेंविशामकरिताझाला ॥२४॥
हीकथाअतिपावन ॥ तुम्हांसीकेलीनिवेदन ॥ अन्यकायकरावया श्रवण ॥ इच्छाअसेतेंसांगा ॥२५॥
ऐकोनीस्कदाचीउक्ति ॥ ऋषीपुसतीतयाप्रती ॥ तेथेंतीर्थेंकोणकोन असती ॥ तेंचसांगेनषण्मुखा ॥२६॥
भोगावतीचेंजलतेथ ॥ कैसेंदेवेंआणिलोंनिश्चित ॥ तेथेंच कपिलमुनीनेंविस्तुत ॥ यज्ञकेलातोसांगा ॥२७॥
हेंसर्व आम्हींपुसिलें ॥ तेंकुपेनेंपाहिजेसांगितले ॥ स्कंदम्हणेऐकासर्वहीभले ॥ परमशुभदायकमहत्म्यहें ॥२८॥
जेंऐकतांसर्वपापापासुन ॥ मानवमुक्तहोयनिश्चयेंजाण ॥ विष्णुनेंदैत्यासमारुन ॥ देहत्याचामंथिला ॥२९॥
तेव्हांत्याच्याशरीरांतुन ॥ रक्तप्रवाहनिघालापूर्ण ॥ तोविष्णुप्रसादेंजलहोऊन ॥ पश्चिमदिशेसीचालिला ॥३०॥
तेंजलपुण्यपावन क्षितीं ॥ नदीझालीभोगावती ॥ स्ननपानेंपहोती ॥ प्राणीसर्वहीभुलोकीं ॥३१॥
तिच्यादक्षिणदिग्भागासी ॥ शिवकपालेश्वरनामज्यासी ॥ कपालपडिलेंत्याप्रदेशीं ॥ धारासुरामहात्म्याचें ॥३२॥
भोगावतीच्यातंटीमनोरम ॥ लक्ष्मीतीर्थातिउत्तम ॥ लक्ष्मीनेंतेंस्थानपरम ॥ पावनकेलेंभुलोकीं ॥३३॥
लक्ष्मीतीर्थाच्याअतिनिकट ॥ भगवानपुरुषोत्तमश्रेष्ठ ॥ त्याच्यापश्चिमेसी तीर्थवरिष्ठ ॥ पुरुषकूपनामजयासी ॥३४॥
लक्ष्मीतीर्थाच्यापश्चिमेसी ॥ ऋणमोचनवापिकानमज्यासी ॥ त्रिविधऋणासतीमानवासी ॥ तेंफिटतसेज्यातीर्थी ॥३५॥
देवऋणऋषीऋण ॥ तिसरेंतेंपितृऋण ॥ यातिन्हीऋणांपासुन मुक्तहोयमानव ॥३६॥
तेथेंचपापविमोचनतीर्थ ॥ पापनाशक अतिसमर्थ ॥ नृसिंव्हाख्यमहार्तीर्थ ॥ भोगवतीच्यादक्षिणतटीं ॥३७॥
तेंसर्वतीर्थाम्मध्येंप्रवर ॥ सर्वपापनाशकथोर ॥ त्याचेदक्षिणेसीअपर ॥ पापनाशकनामतीर्थ ॥३८॥
देवऋशेहेपितृगंधर्वसेवित ॥ भुलोकिंभोगप्रदशाश्वत ॥ तेथेंचसुर्यकुंडतीर्थ ॥ पावनौत्तमभुलोंकीं ॥३९॥
त्याच्यादक्षिणेसीअर्धयोजन ॥ शंकराचेमुत्तमस्थान ॥ जेथेंसाक्षातौमारमण ॥ लोकनुग्रहकरावया ॥४०॥
पार्वतीसहर्वसिद्धीसमवेत ॥ अखंडवसतसे कैलासनाथ ॥ भोगावतीचाउद्भवजेथ ॥ तेथोनीसांगतोंतीर्थासी ॥४१॥
जेंस्थळीदैत्यमस्तकपतन ॥ तेंभोगावतीचेंउद्भवस्थान ॥ नागतीर्थलोकैकपावन ॥ नागेश्वरदेवतेदायी ॥४२॥
तेथुनजवळधारातीर्थ ॥ परमशुभदायकसमर्थ ॥ जीवसंसारग्रहग्रस्त ॥ त्यासीस्वर्गद्वारहोयनिष्कल्मश ॥४३॥
भोगवतीच्याउत्तरप्रदेशीं ॥ चक्रतीर्थनामज्यासी ॥ दुसरेंकपिलतीर्थपुण्यराशीं ॥ तेंअतिशयपावन ॥४४॥
जेथेंकपिलानेंयाग ॥ परमशोभनकेलासांग ॥ आणखींहीतीर्थेंसुभग ॥ असंख्यासतीविप्रेंदा ॥४५॥
जेथेंअसेधारासुर ॥ तेथींचीम्तीर्थेंवर्णिलीथोर ॥ आणिकश्रवणाचीइच्छासाचार ॥ कायअसेलतेसांगा ॥४६॥
ऋषीम्हणतीस्कंदस्वामी ॥ तीर्थाचीनामेंवर्णिलेंतुम्ही ॥ परितीर्थाचामहिमाआम्हीं ॥ ऐकलानाहींतुमच्यामुखें ॥४७॥
तरीआतांतीर्थमहिमा ॥ सांगुनीपावनकराआम्हां ॥ अनुग्रहकरुनीलोकांच्याश्रमा ॥ दुरकरावेंस्वामिया ॥४८॥
धारासुराच्यादेहावर ॥ कैसाविष्णुझालास्थिर ॥ कैलाकपिलानेंकेलाअध्वर ॥ कुपेनेंसमग्रसांगावें ॥४९॥
स्कंदम्हणेमुनीहोऐकावें ॥ तीर्थमहात्म्यतुम्हीबरवें ॥ ज्याच्यास्मरणेंचीअधिकारीव्हावें ॥ ब्रह्मारूपप्राप्तीसी ॥५०॥
जेव्हांविष्णुनेंदतियासीमारिलें ॥ तेव्हांदैत्याच्यादेहांतुनचांगलें ॥ पवित्र उत्तमौदकनिघालें ॥ तेंभोगावतीनामेंनदीझाली ॥५१॥
भगवानतेथेंझालास्थित ॥ हेंइद्रादि देवासझालेंविदित ॥ येऊनीकृतांजलीसमस्त ॥ हर्षयुक्तमनींझाले ॥५२॥
वाचस्पतिप्रमुखदेव ॥ स्तुतिकरुम्लागलेसर्व ॥ सगुणरुपाचेंवैभव ॥ वर्णितीयथामतीनें ॥५३॥
देवाउचुः ॥ श्लोक ॥ नमोनमःकारणकारणाय ॥ नमोनमोमंगलमंगलात्मने ॥ नमोनमः ॥
सर्गलयादिहेतवेज्ञानप्रबोधायनमोनमस्ते ॥ टीका ॥ आदरेंदेवकरितीस्तुति ॥ बहुवारनमोनमोम्हणती ॥ कारणाचेंकारणजगती ॥ तूचाससीएकदेवा ॥५४॥
मूळप्रकृतीपासुन ॥ पृथ्वीपर्यंतचवीसगण ॥ कालकर्मस्वभावजीवाआपण ॥ कर्तासर्वहीकारणसृष्टीसी ॥५५॥
हेंसर्वहीजडस्वतःआपण ॥ जीवहीपरप्रकाशमान ॥ यासर्वासजीवन ॥ सत्तास्फुर्तीप्रदतूंएक ॥५६॥
यास्तवकारणाचेंकारण ॥ तूंचएकमहाकारण ॥ मंगलाचेंमंगलपुर्ण ॥ तूंएकपरमात्मा ॥५७॥
मंगलम्हणजेकल्याण ॥ तेंआनंदाचेंवाचक्रजाण ॥ सतीशयानंडीत्वदंश म्हणुन ॥ परिपूर्णनंदतूंएक ॥५८॥
प्रतिक ॥ सर्वलयदिहेतवे ॥ टीका ॥ उत्पतिस्थितिसंहार ॥ यासीतुंचाआधिष्ठानसाचार ॥
जैसेंमृद्गोलचक्रदंडचीवर ॥ यासीपृथ्वीचाअधार ॥ आणिकारनही ॥५९॥
प्रतिक ॥ ज्ञानप्रबोधाय ॥ टीका ॥ दपर्णाबिंबलेंरविमंडळ ॥ तेंभितीवरीप्रकासेहेझळझळ ॥
परित्याप्रकाशाचेंमुळ ॥ एकदिनकरहोयजैसा ॥६०॥
तैसेंबुद्धीजीवात्माहोऊनीएक ॥ जाणतिविषयघटादिक ॥ परित्याज्ञानाचाप्रबोधएक ॥ प्रत्यगात्मातृंस्वतःसिद्ध ॥६१॥
ऐसादेवतुंसनतन ॥ सहस्त्रधातुजामुचेंनमन ॥ तुझ्यास्वरुपाचेंज्ञान ॥ कोनासीनसेआणिकळसी ॥६२॥
श्लोक ॥ नमोस्तुतेसर्वगुणेंश्वराय ॥ सर्वात्मनेसात्व्कसेविताय ॥ नमोस्तुदेहोंद्रियकर्मवृत्तिभिरज्ञायमानायगुणेश्च ॥ सर्वेः ॥२॥
टीका ॥ सत्वरजतमोगुण ॥ यांनींजीवासीआकळलेंपूर्ण ॥ तुंगुणनियंतानारायण ॥ तुजलाबंधनकरुंनशकती ॥६३॥
कोणत्यागुणाचेंकैसेंबंधन ॥ श्रोतेऐकाविचक्षण ॥ आधींसत्वगुणाचेंबंधन ॥ कैसेंआहेतेंऐका ॥६४॥
मीएकसुखीमीज्ञानी ॥ अधिकमजकळतेंसर्वाहुनी ॥ सत्व्सगुणींटाकिलेंबांधुनी ॥ स्थुळदेहस्तंभीजाणावें ॥६५॥
म्याजंगातमानव्हावें ॥ उत्तमखावेंउत्तमल्यावें ॥ बहुतधनसंपादावें ॥ उद्योगकरावे ॥ दिननिशीं ॥६६॥
हरेंजोगुणाचेंबंधन ॥ देहस्तंभींबांधिलेंपूर्ण ॥ आतांतमाचेंबेंधन ॥ विस्मरणरुपजाणिजे ॥६७॥
आलस्याचेंसुखमानोनी ॥ बैसेउद्योगसोडोनी ॥ निद्राकरावीनिशीदिनीं ॥ स्तब्धराहणेंसर्वदा ॥६८॥
ऐसेंत्रिगुणाचेंबंधन ॥ जीवासीअंखडितजडलेंजाण ॥ आतांमुक्ताचेंलक्षण ॥ प्रसंगेंतेहीऐकावें ॥६९॥
जोदेहभावावेगळा ॥ त्रिगुणकार्याचासाक्षीनिराळा ॥ जाणिवेचासांडुनीचाळा ॥ आत्मारामसर्वदा ॥७०॥
सुरवरकरितीहरीवेंस्तवन ॥ म्हणतीगुणांचाईश्वरतूंपूर्ण ॥ गुणतुजाअकळुंनशकतीजाण ॥ सर्वात्मातुंम्हणोनी ॥७१॥
जोसर्वात्माआपण ॥ त्यासीकोणदुजाकरीलंबधन ॥ अग्निसंयोगेइतरसीइंधन ॥ जाळीलपरिअग्नीसीजाळूनशके ॥७२॥
तूंसर्वात्मापरिपूर्ण ॥ सात्विकतुजलाभजतीजाण ॥ राजसत्तामसदेहाभिमान ॥ धरोनीराहेतीसर्वदा ॥७३॥
सात्विककैसेभजतीजाण ॥ त्याभजनाचेंलक्षण ॥ सुरवरस्वतःवर्णन ॥ करोनीस्तवितीहरीसी ॥७४॥
प्रतिक ॥ नमोस्तदेहोंद्रियकर्मवृत्तिभ्रज्ञानमानायगुणैश्चसवैः ॥ टीका अंतःकरणबुद्धीवृद्धि ॥ परमात्माप्रकाशे ॥
प्रकाशमानहोती ॥ इंद्रियद्वाराबाहेरधांवती ॥ सुखदुह्खात्मक विषयावरी ॥७५॥
इंद्रयेघटादिविषयाप्रती ॥ ऐकतीस्पर्शितीपाह्तीचाखिती ॥ हुंगितीउच्चरित्तीघेतीदेती ॥ चालतीविसर्गकरितीइंद्रियेंही ॥७६॥
प्रानाधारादेहचळतो ॥ इंद्रियद्वारम कर्मकरितो ॥ अंतःकरणद्वाराम्हणवितो ॥ शहाणाआपणसर्वदा ॥७७॥
देहेंद्रियपाण अंतःकरण ॥ याचासंघातहोऊन ॥ निपजतीधर्माधर्मलक्षण ॥ परीतेंत्रिगुण्योगेंसर्वही ॥७८॥
सत्यसंय्होगेंहोयधर्म ॥ रजतमयोगेंअधर्म ॥ अवघेअनात्मास्तुतसंभ्रम ॥ करीतासतीसर्वदा ॥७९॥
हेंसर्वहीजडाचेतन ॥ यासीतुंदेवाअज्ञायमान ॥ जैसनेत्रघटासीजाणेपूर्ण ॥ परीघटनेत्रासीजाणेना ॥८०॥
प्रकाशकव्यापकसंनिधान ॥ असोनतुजनेनतीयासीकारण ॥ तुंज्ञाताचनव्हेसीज्ञेयम्हणुन ॥ विषयकोणाचानव्हेसी ॥८१॥
सर्वदाआहेआज्ञायमान ॥ तरीमगकैसेम्करावेंभजन ॥ हेंसर्वनिरुपणपुढिलश्लोकींहोतसे ॥८२॥
श्लोक ॥ हृत्पद्मवासायसमस्तजंतोर्ज्ञानस्वरुपायनमोनमस्ते ॥ मायातिरिक्तायमाहात्ममायिने ॥ हात्मस्वरुपायनमोनमस्ते ॥३॥
टीका ॥ सर्वजीवाच्याहृदयकमळांत ॥ प्रत्यगात्मरुपीअससेस्थित ॥ ज्ञानमात्रसदोदित ॥ बुद्धीवृत्तीहुनीवेगळा ॥८३॥
बुद्धीवृत्र्तीय्होगेंम्हणावाजीव ॥ मायावृत्तींयोगेंम्हणावाशिव ॥ मायातिरिक्तस्वयमेव ॥ शुद्धस्वरुपतुअससी ॥८४॥
तुमंहात्मामायानियंता ॥ हेहीमायायोगेंतत्त्वता ॥ मायानिषेधेंतुअयतां ॥ निर्विकल्पाअत्मस्वरुपतुं ॥८५॥
श्लोक ॥ यन्मायासर्वमिंदप्रकाशतेयस्यात्मनासर्वामिदंसमुध्ययेयम्वेदवेददांतविदोविदंतिगायंतिवाग्भिर्विपुलाभिसामगाः ॥४॥
टीका ॥ महदादिपृथ्वीपर्यंत ॥ अहंकारादिदेहांत ॥ ब्रह्मादितृनातजगत ॥ हेंतुझ्यामायेनेंभासत ॥ सर्वही ॥८६॥
ज्यांतत्झीअनुवृत्ती ॥ तेणेंहेंसर्वसमृधीहोती ॥ ऐसेंवेदवेदांतजाणती ॥ विपुलवाणीनेंगातीसामग ॥८७॥
श्लोक ॥ यजंतीयज्ञैर्विविधैर्मखजा ॥ नमंतीयंदेवगणःसरुद्रा ॥ स्तुवंतियंब्रह्माविदः सनातनमृज्यंतिसर्वेसमरुद्गनानराः ॥५॥
टीका ॥ मखज्ञानानायज्ञेंयजिती ॥ रुद्रासहितदेवगणवंदिती ॥ सनातनातुजब्रह्मविदस्तविती ॥ तुझ्याभजनेंश्रद्धाहोती ॥ देवादिइतरा ॥८८॥
ऐशाप्रकारेंतुझेंभजन ॥ करितीत्यासीतुंहासीप्रसन्न ॥ नमोनमोतुजपुढतीनमन ॥ नारायणतुजनमो ॥८९॥
ऐसीदेवांनींकेली स्तुती ॥ प्रसन्नहोईलक्ष्मीपती ॥ उत्तराध्यायकिंथाभिव्यक्ति ॥ म्हणेपांडुरंगजनार्दन ॥९०॥
इतिश्रीस्कंदपुरोणेसह्याद्रिखंडेतुरजामहात्म्ये ॥ शंकरवरिष्ठसंवादेतीर्थमहिमावर्णनंनामत्रयत्रिशोध्यायः ॥३३॥
श्रीजगदंबार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

जर तुम्हाला वाहन सुख हवा असेल तर सोमवारी हा सोपा उपाय करा

Amla Navami 2024 :आवला नवमी महत्त्व आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या

या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून अन्न ग्रहण केल्यास अमृत प्राप्ती होते

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

Amla Navami 2024 : आवळ्याच्या खास तीन रेसिपी

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments