Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बीएसएनएल देणार दोन हजारात स्मार्टफोन

bsnl phone
, मंगळवार, 19 सप्टेंबर 2017 (16:56 IST)

सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि मस्त असा  दोन हजार रुपयांचा स्मार्टफोन घेऊन येणार आहे. हा स्मार्टफोन साधारण महिन्याभरात बाजारात उतरण्यात येईल. अनेक उत्पादन कंपन्यांनी यासाठी पुढाकार घेतला असल्याचे बीएसएनएलचे प्रमुख अनुपम श्रीवास्तव यांनी याबाबत माहिती दिली आहे.

बीएसएनएलबरोबर भागीदारी करण्यास मायक्रोमॅक्स आणि लावा यासारख्या भारतीय स्मार्टफोन कंपन्या इच्छुक आहेत. बीएसएनएलकडून ग्राहकांना व्हॉईस पॅक आणण्यात येणार आहे, असेही अनुपम श्रीवास्तव म्हणाले. याचबरोबर, या स्मार्टफोनमध्ये कोणत्या सुविधा असतील याची माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे 'दे धक्का' अंदोलन