Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतात लवकरच लॉन्च होणार स्वस्त iPhone आणि iPad किंमत आणि वैशिष्टये जाणून घ्या

Find out the cheap iPhone and iPad price and features that will be launched in India soon भारतात लवकरच लॉन्च होणार स्वस्त iPhone आणि iPad किंमत आणि वैशिष्टये जाणून घ्या  Marathi IT New Gadgets Marathi News In Webdunia Marathi
, बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (19:50 IST)
अॅपल कंपनी भारतात iPad चे दोन नवीन मॉडेल देखील लॉन्च करू शकते. कंपनीने त्यांची आयात करून चाचणीही सुरू केली आहे. नवीन माहितीनुसार, अॅपल भारतात आगामी काळात iPhone SE 3, नवीन iPad Air आणि बजेट iPad मॉडेल लॉन्च करू शकते. अॅपल भारतात मार्च किंवा एप्रिलमध्ये iPhone SE 3 लॉन्च करू शकते.
या किंमतीबद्दल अंदाज लावला जात आहे की ह्याची किंमत  $300 (सुमारे 23,000 रुपये) असू शकते. सध्या हा स्मार्टफोन कोणत्या नावाने बाजारात येणार आहे. याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.
 
iPhone SE 3 स्मार्टफोनची रचना गेल्या वर्षीच्या iPhone SE 2 सारखीच असेल. यात 4.7-इंचाचा डिस्प्ले, थिक  बेझल आणि टच आयडी सेन्सर असेल. काही रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की त्याची रचना iPhone XR सारखी असेल, ज्यामध्ये नॉच दिला जाऊ शकतो. फोनचा आकार 138.4 x 67.3 x 7.3 मिमी (8.2 मिमी कॅमेरा बंपसह असेल. हा अॅपल फोन A14 Bionic किंवा नवीनतम A15 Bionic चिपसेट आणि 5G कनेक्टिव्हिटीसह ऑफर केला जाऊ शकतो.
 
अॅपलने आयफोनसोबत दोन नवीन आयपॅडही आयात केले आहेत. यामध्ये मॉडेल क्रमांक A2588 आणि A2589 सह iPad Air समाविष्ट आहे. त्याची किंमत 500-700 डॉलर्स (सुमारे 37,500 ते 52,300 रुपये) पर्यंत असू शकते. यासोबतच अॅपल भारतात बजेट आयपॅड लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या परवडणाऱ्या iPad ची किंमत $300 (सुमारे 22,500 रुपये) पर्यंत असण्याची शक्यता आहे. कंपनीच्या बजेट iPads ज्याची चाचणी करत आहे त्यांचे मॉडेल क्रमांक A2757 आणि A2761 आहेत.
 
असे सांगितले जात आहे की अॅपल मार्च किंवा एप्रिलमध्ये लॉन्च इव्हेंट आयोजित करू शकते. Apple च्या आगामी iPhone SE 3, iPad Air आणि iPad ची माहिती येत्या काही दिवसात मिळण्याची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

समीर वानखेडे यांना धक्का, बार आणि रेस्टारेंटचा परवाना रद्द