suvichar

मोबाईल सॅनिटाईज करण्यापूर्वी नक्की वाचा

Webdunia
सोमवार, 7 सप्टेंबर 2020 (12:25 IST)
हल्ली हात स्वच्छ करण्यासाठी सतत सॅनिटायझर किंवा साबणाचा वापर करण्याचा सल्ला दिला जात आहे. कारण करोना संक्रमणापासून बचावासाठी हा एकमेव रामबाण उपाय आहे. पण मोबाईलला Disinfect करणे देखील तेवढेच गरजेचे आहे कारण वर्तमान काळात सतत हातात मोबाईल असणे आणि त्यानंतर कळत-नकळत ते हात आपल्या चेहरा किंवा डोळ्यांना स्पर्श होणे आरोग्यासाठी घातक सिद्ध होऊ शकतं.
 
मोबाइल स्वच्छ करण्यासाठी आपल्या या सामुग्रीची गरज भासेल-
 
सॉफ्ट कपडा, जसा की आपण चष्मा स्वच्छ करण्यासाठी वापरतो.
 
70 टक्क्यांहून अधिक आइसोप्रोपाइल अल्कोहल (याला रबिंग अल्कोहल देखील म्हणतात) किंवा इथेनॉलयुक्त उत्पाद.
 
सॅमसंगच्या वेबसाइट गाइडलाइंस प्रमाणे आपण 70% हून अधिक आइसोप्रोपाइल अल्कोहल वापरून मोबाइल फोन स्वच्छ करू शकता.
 
सर्वात आधी आपला मोबाइल स्वीच ऑफ करावा. नंतर कव्हर काढावं.
 
नरम कपड्याला आइसोप्रोफाइल अल्कोहलने जरा ओलसर करावं. अधिक किंवा गच्च ओलं करू नये याची काळजी घ्या.
 
आता या कपड्याने मोबाइल स्वच्छ करावा.
 
नंतर मोबाइल कव्हर देखील स्वच्छ करावं.
 
अल्कोहोल बेस्ड वाइप्स वापरून देखील मोबाइल सॅनिटाईज करता येऊ शकतो. 
 
मोबाइल सुकल्यानंतर ऑन करावा नाहीतर फोन खराब होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

नवीन

वाहन चालविण्याचा परवाना मिळवण्याचे नियम बदलले आरटीओमध्ये न जाता तुम्ही डीएल कसा मिळवू शकता जाणून घ्या

HMD Vibe 2 5G : एआय वैशिष्ट्ये आणि ६०००mAh बॅटरी असलेला १० हजाराहून कमी किमतीचा स्मार्टफोन लॉन्च

सीबीएसईच्या पुनर्मूल्यांकन पोर्टलवर सायबर हल्ला, अध्यक्ष आणि सचिव यांना पदावरून हटवले

LIVE: लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या तब्बल 81 लाख महिलांना एकवेळची सवलत

लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या तब्बल 81 लाख महिलांना एकवेळची सवलत, लाभ घेणाऱ्या पुरुषांकडून होणार वसुली

पुढील लेख
Show comments