Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Nokia 2.2 भारतात झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर

Nokia 2.2 भारतात झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर
, शुक्रवार, 7 जून 2019 (14:17 IST)
NOKIA ब्रँडचे स्मार्टफोन बनवणार्‍या कंपनी HMD ग्लोबल ने भारतात Nokia 2.2 लाँच केलं आहे. अँड्रॉइड वन प्रोग्राम अंतर्गत येणारा हा एक स्वस्त फोन आहे. नोकियाचा हा फोन अँड्रॉइड पाईवर चालत आहे आणि लवकरच यात Android Q चा सपोर्ट देखील मिळेल. कंपनीने यात डिजिटल वेल बीइंग फीचर देखील उपलब्ध करवलं आहे.
 
कंपनीने यात एक डेडीकेटेड गुगल असिस्टंट बटण देखील दिला आहे. हा बटण गुगल असिस्टंट walkie talkie फीचरला सपोर्ट करतो. या फोनचे दोन व्हेरिएंट लॉन्च करण्यात आले आहे. HMD ग्लोबलनुसार, Nokia 2.2 च्या 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज व्हेरिएंटची भारतात किंमत 7,699 रुपये आणि 3GB + 32GB व्हेरिएंटची किंमत 8,699 रुपये ठेवण्यात आली आहे.
 
या फोनमध्ये 5.71-इंच एचडी प्लस डिस्प्ले स्क्रीन दिली गेली आहे, ज्याचे ऑस्पेक्ट रेशिओ 19:9 आहे. यात 2 GHz स्पीडचा क्वाड-कोर MediaTek Helio A22 प्रोसेसर देण्यात आलं आहे. यासह आणि पाच वाटांसह 3000 एमएएच बॅटरी दिली गेली आहे. यात बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सेलचा कॅमेरा सेल्फी प्रेमींसाठी फ्रंटमध्ये 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Jio GigaFiber ची नवीन सेवा लाँच, आता अर्ध्या किमतीत मिळेल कनेक्शन