suvichar

नोकिया 8 होणार 16 ऑगस्ट रोजी लाँच !

Webdunia
गुरूवार, 27 जुलै 2017 (11:29 IST)
एचएमडी ग्लोबलकडून नोकिया 8 हा स्मार्टफोन 16 ऑगस्ट रोजी लाँच केला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच टिप्स्टर इव्हान ब्लासने या फोनचा कथित फोटो ट्विटरवर शेअर केला होता. या फोनचा लाँचिंग कार्यक्रम लंडनमध्ये होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
 
काही दिवसांपूर्वीच समोर आलेल्या फोटोनुसार नोकिया 8 ला मेटल बॉडी असेल. तर व्हर्टिकल ड्युअल रिअर कॅमेराही देण्यात आला आहे. या फोनचा फ्रंट लूकही आकर्षक आहे. समोर होम बटण देण्यात आलं आहे, जे फिंगरप्रिंट सेन्सर असण्याची शक्यता आहे. एचमएडी ग्लोबलकडे नोकियाचे हक्क आहेत. या कंपनीने Zeiss सोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे नोकिया 8 मध्ये Zeiss लेंस असेल, असा अंदाज लावला जात होता. अखेर हा अंदाज खरा ठरला. यापूर्वीच्या लीक रिपोर्टनुसार, नोकिया 8 मध्ये क्वालकॉम लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर, 5 इंच आकाराची आणि 5.5 इंच आकाराची स्क्रीन असे दोन व्हेरिएंट, 4 किंवा 6 GB रॅम, 128 GB स्टोरेज आणि 23 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा असेल.
सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

मुंबईतील मेट्रो लाईन ६ च्या कामामुळे २५-२६ एप्रिल रोजी पश्चिम रेल्वेवर रात्रीच्या वेळी वाहतूक बंद राहणार

LIVE: मुंबईतील मेट्रो लाईन ६ च्या कामामुळे २५-२६ एप्रिल रोजी पश्चिम आणि मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक आणि नाईट ब्लॉक लागू

केएल राहुलने रैना आणि धोनीला मागे टाकत आयपीएलमधील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला

क्षेत्ररक्षण करताना लुंगी एनगिडी गंभीर जखमी झाले

Maharashtra Day 2026 Speech in Marathi महाराष्ट्र दिन भाषण

पुढील लेख
Show comments