भारतीय बाजारात चार महिन्यात 'रेडमी नोट 5' सिरीजचे ५० लाख मोबाईल विकले गेल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 'रेडमी नोट 5' (Redmi Note 5) आणि 'रेडमी नोट 5 प्रो' (Redmi Note 5 Pro)हे दोन मोबाईल भारतीय ग्राहकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. यामुळे शाओमी (Xiaomi)ने भारतीय बाजारात मोठा रेकॉर्ड बनवला आहे.
'रेडमी नोट 5' आणि 'रेडमी नोट 5 प्रो' व्हर्जन असलेला 'रेडमी नोट 5' सिरीज कंपनीने याच वर्षी फेब्रुवारीत लॉन्च केली होती. 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल मेमरी असलेल्या 'रेडमी नोट 5' ची किंमत 9,999 रुपये आहे. तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी असलेल्या मोबाईलची किंमत 11,999 रुपये आहे. स्मार्टफोनमध्ये '18:9 फुल एचडी प्लस' डिस्प्ले, 4,000 mAh बॅटरी आणि क्वालकम स्नॅपड्रेगन 625 प्रोसेसरसोबत 12 MPरिअर कॅमेरा आणि कमी प्रकाशातही एलईडी सेल्फी लाईटची सुविधा देण्यात आली आहे.
'रेडमी नोट 5 प्रो' च्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी असलेल्या मोबाईलची किंमत 13,999 रुपये आहे. तर 6 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल असलेल्या मोबाईलची किंमत 16,999 रुपये आहे. यात '18:9 फुल एचडी प्लस' डिस्प्ले त्याचबरोबर ड्युल रियर कॅमेरा सिस्टम (12 MP आणि 5 MP), 20 MPचा सेल्फी कॅमेरा, 'फेस अनलॉक' ऑप्शन आणि स्नॅपड्रेगन 636 प्रोसेसर देण्यात आला आहे.