जिओने मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये प्रतिष्ठित ग्लोबल मोबाईल अॅवॉर्ड २०१८ जिंकलाय. हा अॅवॉर्ड बेस्ट मोबाईल ऑपरेटर सर्व्हिस फॉर कन्झ्युमरसाठी देण्यात आलाय. हा अॅवॉर्ड मोबाईल विश्वातील ऑस्कर अॅवॉर्ड मानला जातो. याशिवाय कंपनीच्या जिओ टीव्ही अॅपने बेस्ट मोबाईल व्हिडीओ कंटेट श्रेणीमधील अॅवॉर्ड मिळवलाय.
भारतात ४ जी नेटवर्क आणि स्वस्तात डेटा आणि डिजीटल सेवा देण्यासोबतच इनोव्हेटिव टेक्नोलॉजी आणि नवा व्यवसायिक दृष्टिकोन देत भारताला डिजीटल रुपाने सक्षम राष्ट्र बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलीये. जिओच्या या प्रतिष्ठित पुरस्कारासह जागतिक स्तरावर नवी ओळख मिळालीये. जिओने टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवताच डेटा वापराचे पॅटर्नच बदलले. भारत आता जगातील सर्वात मोठा मोबाईल वापराचा देश बनलाय. जिओच्या माध्यमातून कोट्यावधी भारतीयांनी डिजीटल लाईफस्टाईल आपलीशी केलीये. जिओ लाँच केल्यानंतर १६ महिन्यांच्या आत १६ कोटीहून अधिक ग्राहक या नेटवर्कशी जोडले गेले.