Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Smartphone चे Smart फीचर्स, आपणास माहिती नसतील तर जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 1 जुलै 2020 (13:12 IST)
आजच्या काळात, सर्व लोकं स्मार्टफोन वापरतात, पण कोणाला विचारलं की आपल्याला आपल्या डिव्हाईसबद्दल कितपत माहिती आहे, तर कदाचित ह्याचे उत्तर कोणास देता येईल. बरं, आज आम्ही आपल्याला स्मार्टफोनशी निगडित काही खास फीचर्स सांगणार आहोत, ज्यांचा बद्दल आपल्याला कदाचितच माहिती असेल. 
 
एकाच वेळी 2 अ‍ॅप्स वापरा : 
जर आपण एकच वेळी 2 अ‍ॅप्स वापरू इच्छित असल्यास आपल्याला स्प्लिट स्क्रीन फीचर्स वापरावं लागणार. यासाठी आपण सर्वात आधी एक अ‍ॅप उघडा आणि त्यानंतर त्यावरील तीन बिंदूंना टॅप करा. आपणास स्प्लिट स्क्रीन लिहिलेले दिसून येईल. यावर टॅप करा. आता आपण आपल्या हिशोबाने आणि गरजेप्रमाणे अ‍ॅप स्क्रीन कमी- जास्त करू शकता. याच पद्धतीचा वापर दुसऱ्या अ‍ॅपसाठी करावं.
 
दोन फिंगर प्रिंट सक्रिय करावं : 
बऱ्याच वेळा असं घडतं की आपण आपल्या फोनमध्ये उजव्या हाताची फिंगरप्रिंट सेट करतो पण आपला उजवा हात व्यस्त असल्याने आपल्याला अस्वस्थता जाणवते. अश्या परिस्थितीला टाळण्यासाठी आपण आपल्या फोनमध्ये 5 - 5 फिंगर प्रिंट जोडू शकता. त्यासाठी आपल्याला सेटिंगमध्ये सिक्युरिटी ऍड लोकेशनवर जाऊन फिंगरप्रिंट क्लिक करा. नंतर आपल्याला एड फिंगरप्रिंट पर्याय दिसेल, इथून आपण 5 पर्यंत फिंगरप्रिंट जोडू शकता. 
 
फोटो- व्हिडिओ डिलीट झाल्यास काळजी नको : 
तसं तर कोणाबरोबर असं होऊ नये तेच चांगले पण देव न करो की कोणाचा फोन गहाण झाला तर सर्वात जास्त काळजी फोन मध्ये असलेले नंबर, व्हिडियो, फोटो आणि फाइल्सची असते. अश्या परिस्थितीत आपण ऑटो बॅकअप चालू करू शकता. यासाठी फोनच्या सेटिंग्स सिस्टम मध्ये जाऊन बॅकअप ऑन करा आणि आपल्या जीमेल आयडीला निवडून बॅकअप नाऊ वर क्लिक करा. तसं हे काम आपण वायफाय नेटवर्क वर करा अन्यथा जास्त फाइल्स असल्यास आपल्या फोनचा डेटा संपणार. 
 
नोटिफिकेशनपासून सुटका : 
बहुदा लोकं वारंवार येणाऱ्या निरुपयोगी नोटिफिकेशनमुळे त्रस्त असतात. आपण देखील होत असणारच. यापासून सुटका मिळविण्यासाठी आपल्याला काही काळ येणाऱ्या सूचना वर दाबून ठेवावं लागणार. आता इथे आपल्याला ब्लॉक आणि म्यूट असे पर्याय मिळतील. या दोन्ही पर्यायाला निवडून आपण निरुपयोगी सूचना टाळू शकाल. जर का आपणास सूचनांना पूर्णपणे थांबवायचे असेल तर ब्लॉक विकल्पाला क्लिक करा. त्याशिवाय आपण म्यूट विकल्पाला क्लिक करून काही काळा पर्यंत सूचनांना बंद करू शकता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: अटारी सीमा बंद झाल्यामुळे नागपूरचे रहिवासी पाकिस्तानात अडकले

अटारी सीमा बंद झाल्यामुळे नागपूरचे रहिवासी पाकिस्तानात अडकले

भोपाळमध्ये अनेक विद्यार्थिनींशी मैत्री केल्यानंतर बलात्कार, व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले

सुरक्षा दलांनी बांदीपोरा जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

महिलांनी टिकल्या काढल्या अल्लाह हू अकबर'च्या घोषणा दिल्या पीडितांनी वेदना व्यक्त केल्या

पुढील लेख
Show comments